Monday, July 8, 2024

नव्याचे नऊ दिवस! लग्नाच्या काही महिन्यानंतरच मिताली आणि सिद्धार्थमध्ये उडाले वादाचे खटके? व्हिडिओ पाहाच

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडपे म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर. या दोघांच्या प्रेमापासून ते सप्तपदी घेऊन एकत्र आयुष्याला सुरुवात करेपर्यंतचा गोड प्रवास प्रेक्षकांनी पाहिला आहे. ते दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांचे अनेक रोमँटिक तसेच मजेशीर व्हिडिओ आपण पाहिले आहेत. या दोघांमधील प्रेम, मस्ती, रुसवे, फुगवे त्यांच्या चाहत्यांना खूप आवडतात. त्यामुळेच त्यांची कोणतीही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असते. अशातच या गोड जोडप्यामध्ये कडाक्याचे भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे.

मितालीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मिताली आणि सिद्धार्थ जोरजोरात भांडत असतात. त्यांचं हे भांडण सिद्धार्थने अंघोळ झाल्यावर ओला टॉवेल बेडवर टाकल्यामुळे झाले आहे. (Mitali mayekar and siddharth chandekar’s funny video viral on social media)

या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ कॅमेरासमोर काहीतरी बोलत असतो. त्यावेळी मिताली येते आणि टॉवेल तिथे टाकला म्हणून भांडत असते. त्यावेळी सिद्धार्थ देखील म्हणतो की, “एकदा टाकला तर काय झालं.’ यानंतर त्यांच्यात खूप भांडणं होतात आणि रागात मिताली त्याला “शटअप,” असे म्हणते. यावर सिद्धार्थ “अँड बेंड ओव्हर,’ असे म्हणून डान्स स्टेप्स करतो आणि टॉवेल उचलून तेथून निघून जातो. यानंतर मिताली डोक्यालाच हात लावते.

त्याच्या या मजेशीर व्हिडिओवर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर जुईली जोगळेकर, रोहित राऊत, नचिकेत लेले यांनी हसण्याची ईमोजी पोस्ट केली आहे, तर अभिज्ञा भावेने या व्हिडिओवर कमेंट केली आहे की, “किती टेक्स झाले सांग हसायला आल्यामुळे.” एका चाहत्याने “घर घर की कहानी,” अशी कमेंट केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आहे.

मितालीच्या‌ कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१० साली अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने ‘क्लासमेट’, ‘वजनदार’, ‘झिम्मा’, ‘बस स्टॉप’, ‘सिटी ऑफ ड्रिम’, ‘रणांगण’, ‘हिरकणी’ यांसारख्या चित्रपटात काम करून त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. त्याने स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ दिवशी होणार झी मराठी पुरस्कार सोहळा साजरा, प्रिया मराठेने व्हिडिओ शेअर करून दाखवली डान्सची झलक

-सोनाली कुलकर्णीचा ‘शटर’ चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर

-‘…मी माथा टेकवून त्यांची माफी मागते’, म्हणत शिवलीला पाटील यांनी मागितली सांप्रदायिक क्षेत्रातील व्यक्तींची माफी

हे देखील वाचा