Monday, July 8, 2024

मिताली अन् सिद्धार्थच्या सुंदर फोटोवर कलाकार फिदा; तुम्हीही म्हणाल, ‘राजा राणीची जोडी!’

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील नवविवाहित आणि अत्यंत रोमँटिक जोडपे आहे. त्यांच्या प्रेमाची तसेच लग्नाची कहाणी सगळ्यांची पाहिली आहे. ते दोघेही नेहमी त्यांचे मजेशीर आणि रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांची केमिस्ट्री खूप आवडते. सगळे त्यांच्या फोटोवर प्रतिक्रिया देत असतात. अशातच त्यांचा एक गोड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मितालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सिद्धार्थसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. तुम्ही पाहू शकता की, मितालीने केशरी रंगाचीा हिरवा काठ असलेली साडी नेसलेली आहे. गळ्यात मंगळसूत्र आणि कानात मोठे इअरिंग घातले आहेत. तसेच या फोटोमध्ये सिद्धार्थ देखील खूप हँडसम दिसत आहे. तसेच त्यांच्यातील प्रेम या फोटोमध्ये दिसत आहे. (Mitali mayekar share a photo with her husband siddharth chandekar on social media)

त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने हार्ट ईमोजी पोस्ट केला आहे. त्यांचे चाहते त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहेत. या फोटोला आतापर्यंत ५७ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.

मितालीच्या‌ कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१० साली अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने ‘क्लासमेट’, ‘वजनदार’, ‘झिम्मा’, ‘बस स्टॉप’, ‘सिटी ऑफ ड्रीम्स’, ‘रणांगण’, ‘हिरकणी’ यांसारख्या चित्रपटात काम करून त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली आहे. तो सध्या स्टार प्रवाहावरील ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

हे देखील वाचा