Monday, July 8, 2024

मितालीने नवीन फोटो केला शेअर, लक्षवेधी कॅप्शन देत म्हणाली, ‘स्वत: ला कापडात गुंडाळून…’

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत मिताली मयेकर हे नाव नेहमीच असते. मिताली ही अत्यंत ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री आहे. चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील तिचा खूप वावर असतो. अनेकवेळा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर चाहतावर्ग भरपूर असल्याने तिच्या पोस्टला देखील जोरदार प्रतिसाद मिळत असतो. अशातच तिने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मितालीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू पाहू शकता की, मिताली एका शांत-एकांत जागी खुर्चीवर बसलेली दिसत आहे. तिने राखाडी रंगाचा ड्रेस घातला आहे. तसेच तिने केस मोकळे सोडले आहेत. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे, “स्वतःला कापडात गुंढाळून घेणे हा किती हास्यास्पद विचार आहे ना! पण माझ्या ड्रॅगनफ्लाय हे तुला ठीक वाटत आहे का?” तिचा हा फोटो आणि कॅप्शन तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. अनेकजण तिच्या या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. अगदी दोन तासापूर्वी शेअर केलेल्या या फोटोला १६ हजारांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. (mitali mayekar share her photo on social media)

मितालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने इरफान खानच्या ‘बिल्लू’ या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. यात मिताली इरफान खानच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. नंतर तिने ‘असंभव’, ‘अनुबंध’, ‘उंच माझा झोका’, ‘तूच माझा सांगती’ अशा मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या. पुढे ‘उर्फी’मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत तिने मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.

‘फ्रेशर्स’, ‘आम्ही बेफिकर’, ‘स्माईल प्लिज’, ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. तसेच तिने झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत देखील काम केले आहे.

मितालीने या वर्षाच्या सुरुवातीला तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ चांदेकर याच्याशी लग्न केले आहे. सिद्धार्थदेखील एक अभिनेता आहे. तो सध्या ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिकिनी अन् दोन वेण्या घालून अभिनेत्री मोनालिसाने केले मालदीवमधील फोटो शेअर, पतीही दिसला शर्टलेस

-‘सुंदरा गं माझी’, सायली संजीवच्या स्टायलिश लूकवर ‘या’ अभिनेत्रीची लक्षवेधी कमेंट

-राडाच ना! ईशा गुप्ताने केली बोल्डनेसची सीमा पार, बिकिनी फोटो जोरदार व्हायरल

हे देखील वाचा