Wednesday, July 3, 2024

जेव्हा गाणे गाताना अचानक ओरडली मिताली, पाहुन सिद्धार्थही झाला स्तब्ध; मग पुढे…

मराठी चित्रपट सृष्टीतील अत्यंत रोमँटिक जोडपे म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर होय. हे जोडपे या वर्षाच्या सुरुवातीला विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत असतात. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांचे हे व्हिडिओ आवडतात. अशातच मिताली आणि सिद्धार्थचा एक कॉमेडी व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हीही हसून हसून अगदी लोटपोट व्हाल.

सिद्धार्थने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून मितालीसोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही साध्या कपड्यात दिसत आहेत. त्या दोघांनी किचनमधील साहित्य हातात घेतले आहेत. सिद्धार्थ एका इंग्लिश गाण्यावर लिप्सिंग करत असतो. तेव्हा मिताली मधेच मोठ्याने ओरडते. हे पाहून सिद्धार्थ लगेच व्हिडिओ बंद करतो. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. त्याच्या या व्हिडिओवर मंजिरी ओक, स्पृहा जोशी, अमेय वाघ, सखी गोखले या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. त्यांच्या या वेडेपणाला सगळेच हसत आहेत. तसेच त्यांचे चाहते देखील जोरदार कमेंट करत आहेत.

मिताली आणि सिद्धार्थने अजून ऑनस्क्रीन काम केले नाही. पण ऑफस्क्रीन त्यांची केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहते आता त्यांना ऑनस्क्रीन पाहण्यासाठी उत्सुक आहे.

मितालीच्या‌ कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘उर्फी’, ‘फ्रेशर्स’, ‘यारी दोस्ती’, ‘बिल्लू’, ‘आम्ही बेफिकीर’, ‘घेतला वसा टाकू नको’ या चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेही तिने झी मराठीवरील ‘लाडाची गं लेक मी’ या मालिकेत काम केले आहे. (mitali mayker and siddharth chandekar’s funny video viral on social media)

सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१० साली अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्याने ‘क्लासमेट’, ‘वजनदार’, ‘झिम्मा’, ‘बस स्टॉप’, ‘सिटी ऑफ ड्रिम’, ‘रणांगण’, ‘हिरकणी’ या सारख्या चित्रपटात काम करून त्याच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पडली आहे. तो सध्या स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस ना’ मालिकेत काम करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आलिया भट्टला किस करताना दिसला रणबीर कपूर, ‘त्या’ फोटोमध्ये पाहायला मिळाली दोघांची रोमॅंटिक केमिस्ट्री

-‘सुपर डान्सर ४’च्या मंचावर शिल्पा शेट्टीचे दणक्यात स्वागत; सगळ्यांचे प्रेम पाहून अभिनेत्रीला अश्रू झाले अनावर

-Bigg Boss OTT : शमिता शेट्टी अन् राकेश बापट यांच्यामध्ये वादावादी, अभिनेत्रीने दिला डायपर घालण्याचा सल्ला

हे देखील वाचा