७० वर्षाचे मिथुन चक्रवर्ती सध्या ‘द ह्या काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी मसुरी येथे आहेत. मात्र शनिवारी मिथुन आऊटडोअर शूटिंग सुरु असताना अचानक सेटवर कोसळले. फूड पॉइझनिंगमुळे त्यांना उभं सुद्धा राहता येत नव्हते. थोडा वेळ ब्रेक घेऊन त्यांनी त्यांचे शूटिंग पूर्ण केले.
‘द काश्मीर फाइल्स’ ह्या सिनेमातून १९९० मध्ये काश्मिरी पंडितांवरील अत्याचार, हत्याकांडाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबतच अनुपम खेर आणि पुनीत इस्सर यांच्याही या चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत.
मिथुन चक्रवर्ती यांच्या बॉलिवूडच्या प्रवासावर सांगायचे झाले तर मिथुन यांनी हिंदी सिनेसृष्टीत कोणत्याही गॉडफादर शिवाय आपले नाव कमावले.
मिथुन चक्रवर्ती यांचा जन्म १६ जून १९५२ साली झाला. त्यांचे खरे नाव गौरांग चक्रवर्ती आहे. मात्र त्यांनी बॉलिवूडमध्ये कधीच त्यांचे खरे नाव वापरले नाही. चित्रपटात येण्यापूर्वी मिथुन नक्षलवादी होते. मात्र परिवाराचा विरोध आणि त्यांच्या एकमेव भावाचे विजेचा शॉक लागून झालेले निधन यांमुळे ते नक्षलवाद सोडून पुन्हा घरी आले.

मिथुन यांनी १९७६ साली ‘मृगया’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांना त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुसरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानंतर मिथुन यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मिथुन यांच्या आगळ्यावेगळ्या डान्स स्टाईलमुळे ते डान्सिंग स्टार म्हणून प्रसिद्ध झाले. १९८२ साली आलेल्या ‘डिस्को डांसर’ या सिनेमानंतर त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन बसवले.
मिथुन यांचे चित्रपटांसोबतच वैयक्तिक जीवनही चर्चेचा विषय ठरत असायचे. मिथुन आणि श्रीदेवी यांच्या लपून झालेल्या लग्नाच्या बातम्यांनी तर पूर आणला होता. कारण योगिता बाली यांच्यासोबत लग्न होऊनही मिथुन यांनी श्रीदेवी सोबत पुन्हा लग्न केले होते. १९८४ साली ‘जाग उठा इंसान’ सिनेमात श्रीदेवी आणि मिथुन पहिल्यांदा एकत्र आले. चित्रपटाच्या शूटिंग पासूनच त्यांच्या अफेयरच्या बातम्यांनी जोर घेतला होता. मिथुन यांनी एका मुलाखतीत कबुल केले होते की, ‘ त्यांनी श्रीदेवी यांच्यासोबत लग्न केले होते.’ मात्र नंतर त्यांनी त्यांचे नाते रद्द केले.
अमरदीप. शौकीन, हम पांच, डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, डान्स डान्स, यमराज, गुंड, गुरु, जल्लाद, किक, वीर आदी चित्रपटांमध्ये काम केले. मिथुन यांनी जवळपास ३५० चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. हिंदीसोबतच त्यांनी बंगाली, उडिया आणि भोजपुरी चित्रपटात काम केले आहे.

‘सर्व दिवस सारखे नसतात’ ह्याच उक्ती प्रमाणे मिथुननेही अनेक वर्ष फक्त यश पाहिले पण १९९३ पासून १९९८ पर्यंत त्यानं फक्त आणि फक्त अपयश मिळाले. एका, दोन नाही तर त्यांचे तब्बल ३३ चित्रपट एकापाठोपाठ एका फ्लॉप झाले. असे असूनही त्यांनी त्यांच्या हिमतीवर १२ चित्रपट साईन केले होते. आजही मिथुन यांचा डान्स आणि हेयरस्टाईल खूप प्रसिद्ध आहे.
मिथुन हे फक्त चित्रपटातच नाही तर संपत्तीच्याबाबतीतही हिरो आहेत. मुंबई आणि उटी या शहरात मिथुन यांचे काही बंगले आणि हॉटेल्स आहेत. मिथुन हे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील मोनार्क ग्रुपचे मालक आहे.










