Wednesday, July 3, 2024

‘मला अख्तरांसारखा मुसलमान हवा’ म्हणत राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केले जावेद अख्तर यांचे कौतुक

नुकतीच मराठी नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि आपण डोक्यात गुढीपाडवा हा सण साजरा केला. या दिवसाच्या निमित्ताने पण सर्वच अनेक गोष्टींची सुरुवात करतो. गुढीपाडवा सर्वांसाठीच खास असतो. अशाच हा दिवस महाराष्ट्रातील राजकारणासाठी देखील महत्वाचा असतो. कारण या दिवशी परंपरेनुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होते. संपूर्ण देशाचे या सभेकडे लक्ष असते. यावर्षी राज ठाकरे काय बोलणार आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना काय सांगणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा परंपरेनुसार गुढीपाडवा मेळावा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी तब्बल ४० हजार मनसैनिकांनी या मेळाव्याला हजेरी लावली होती. राज ठाकरेंनी यावेळी अनेकांवर टीका केली तर काहींवर स्तुतीसुमने देखील उधळली. या सभेमध्ये ज्या व्यक्तीवर राज ठाकरे यांनी कौतुकाचा वर्षाव केला ते आहे, गीतकार, लेखक, शायर जावेद अख्तर. हो राज ठाकरे यांनी सभेमध्ये त्यांचे कौतुक केले.

‘मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे मात्र तो मुसलमान जावेद अख्तर यांच्या सारखा मुसलमान हवा.’ राज ठकरे यांनी जावेद साहेबांचे कौतुक करताना म्हटले, “तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून तुम्ही कुणाकडे बघता? असे परवा मला कुणीतरी विचारले. त्यावेळी मी सांगितले मला धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय. जो स्वत:चा धर्म बघेल, दुसऱ्या धर्माचाही मान राखेल. मला अशी माणसे हवी आहेत. मुस्लिम धर्मामधली देखील हवीत पण ती कोणासारखी हवीत तर जावेद अख्तरांसारखी. जावेद साहेबानी पाकिस्तानात जाऊन तिथल्या लोकांना ऐकवले. आमच्या मुंबईवर तुमच्या माणसांनी हल्ला केला, आमची ती जखम आजही ताजीच असल्याचे त्यांनी ठामपणाने सांगितले.”

हे सांगितल्यानंतर राज ठाकरे यांनी जावेद अख्तर यांचा तो व्हिडिओ देखील सर्वाना दाखवला. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे प्रसिद्ध उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या एका साहित्यिक सभेसाठी लाहोरमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानला आतंकवादावरून तिखट शब्दात चांगलेच फटकारले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

हे देखील वाचा