संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तसेच रुग्णांसाठी वैद्यकीय सोयी सुविधांचा तुटवडा देखील जाणवत आहे. अनेक रुग्णांना ऑक्सिजन आणि आयसीयू बेडची कमतरता भासत आहे. वेळेत सुविधा न मिळाल्यामुळे अनेकांचे प्राण जात आहे. अनेकजण रुग्नांना मदत देखील करत आहे. अश्यातच दिल्लीमध्ये मोबाईल थिएटरला हॉस्पिटलचे रूप देऊन ते थेटर ताब्यात घेण्यात आले आहे. या मोबाईल कंपनीने अपोला हॉस्पिटलच्या सांगण्यानुसार त्यांच्या थिएटरचे केवळ ३ दिवसात हॉस्पिटलमध्ये रुपांतर केले आहे.
अपोला हॉस्पिटलमधील कर्मचार्यांनी कोरोना बाधीत रुग्णांच्या सेवेसाठी पिक्चर टाईम कंपनीकडे मदत मागितली. खरंतर ही कंपनी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. पण अपोला हॉस्पिटलच्या सांगण्यावरून त्यांची जागा रिकामी करून तिथे हॉस्पिटलमधील सगळ्या गोष्टी आणल्या आहेत. तिथे बेड, सगळी औषधे, इतर प्राथमिक सुविधा एवढेच नव्हे तर प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा देखील केली आहे.
https://www.facebook.com/picturetimedigiplex/posts/1684565328418392
पिक्चर टाईमचे हे हॉस्पिटल दिल्लीमध्ये चालू झाले आहे. कंपनीने असे देखील सांगितले आहे की, जर इतर कोणत्या हॉस्पिटलने त्यांच्याकडे मदत मागितली तर अशी मदत करायला ते तयार आहेत. याबाबत बोलताना पिक्चर टाईमचे संस्थापक सुशील चौधरी यांनी सांगितले की,” संकटाच्या काळात असे निर्णय घ्यावे लागतात. या वेळी आपण फक्त सरकारला मदत केली पाहिजे आणि आपल्या देशाला लवकरात लवकर या संकटातून बाहेर काढले पाहिजे. ज्या प्रकारे हा विषाणू वेगाने पसरत आहे त्यानुसार आपल्याला आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.”
अपोला हॉस्पिटलचे उपाध्यक्ष डॉक्टर करण ठाकूर यांनी सांगितले की, ” पिक्चर टाइम सोबत या हॉस्पिटलची उभारणी केल्यामुळे मला खूपच गर्व होत आहे. कोरोना रुग्णांना मदत करून आम्हाला खूपच आनंद होत आहे. केवळ आठवड्याभरात 40 बेडची सोय करून ते चालू करणे हा काय खेळ नाहीये.पण मोबाईल पिक्चर कंपनीने हे करून दाखवले आहे.”










