Monday, July 1, 2024

अभिनेता जॅकी भगनानीवर लैंगिक छळाचा आरोप; बॉलिवूडमधील ९ मोठ्या व्यक्तींविरुद्ध मॉडेलने दाखल केला गुन्हा

बॉलिवूडमधून अनेक चांगल्या- वाईट बातम्या समोर येत आहेत. यातील एक म्हणजे गीतकार आणि माजी मॉडेलने हिंदी चित्रपटसृष्टीतील नऊ मोठ्या व्यक्तींवर बलात्कार आणि लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, या मॉडेलने फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन याच्यावर बलात्काराचा आरोप, तर बॉलिवूड अभिनेता जॅकी भगनानीसह इतर आठ लोकांवर लैंगिक छळाचा आरोप लावला आहे.

ही मॉडेल 28 वर्षाची आहे. तिने असा आरोप केला आहे की, 2004 पासून 2018 पर्यंत अनेक वेळी तिचा लैंगिक छळ झाला आहे. एफआयआरमध्ये सामील अभिनेता जॅकी भगनानी याचावर आरोप आहे की, त्याने बांद्रामध्ये तिचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच निखिल कामतने सांताक्रुझमधील एका हॉटेलमध्ये तिचा लैंगिक छळ केला आहे. तसेच त्याच्यासोबत आणखी 7 लोक तिथे उपस्थित होते. यामध्ये टीव्ही सीरिजमधील कृष्ण कुमार, टॅलेंट मॅनेज कंपनी क्वानचे सह संस्थापक अनिर्बान दास ब्लाह, शील गुप्ता, अजित ठाकूर, गुरू ज्योत सिंग आणि कृष्ण वर्धन इंदुरी यांच्या नावाचा समावेश आहे.

पीडित स्त्रीने फोटोग्राफर कॉलस्टन ज्युलियन याच्यावर अनेक वेळा बलात्काराचा आरोप लावला आहे. तिने सांगितले की, “ती चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईला आली होती. पण चित्रपटात काम देतो असे आमिष दाखवून अनेक वेळा तिचे शारीरिक शोषण करण्यात आले आहे. पण अजूनही पोलिसांनी कोणालाच अटक केले नाही.”

बांद्रा पोलीस स्टेशनमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या गोष्टीचा खुलासा केला आहे की, या घटनेबाबत एफआयआर दाखल केला आहे. परंतु त्यांनी याबाबत जास्त माहिती देण्यास नकार दिला. यातील एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही सगळ्या आरोपींवर भारतीय दंड संहितेनुसार ३७८ (N), ३५४ आणि ३४ या कलमांचा आधार घेऊन गुन्हा दाखल केला आहे. या घटनेबाबत आम्ही जास्त माहिती मिळवत आहोत. आम्ही लवकरात लवकर आरोपींची चौकशी करू.”

नाकारले आरोप
निर्माता अजित ठाकूरने माजी मॉडेलचे आरोप नाकारले आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की, मॉडेलने लावलेले सर्व आरोप निराधार आहेत. ई टाईम्सशी बोलताना त्यांनी म्हटले की, “जे काही आरोप लावण्यात आले आहेत, ते सर्व चुकीचे आणि बदनामी करण्याच्या हेतूने लावले आहेत. त्यांची प्रतिम खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

यापूर्वीही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनी समोर येऊन आपल्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचचा खुलासा केला आहे. यामध्ये झरीन खान, किश्वर मर्चंट यांसारख्या अनेक अभिनेत्रींना या गोष्टीचा सामना करावा लागला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा