सुपरमॉडेल हेली बीबरला (Hailey Bieber) नुकतेच स्ट्रोक सारख्या लक्षणांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये जस्टिन बीबरची (Justin Bieber) पत्नी हेली बीबरने एक नोट शेअर केली आहे. या नोटमध्ये तिने तिच्या आजाराबाबत सविस्तर माहिती दिली आहे. यासोबतच तिने सर्व लोकांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल आभारही मानले आहेत. हेलीने सांगितले की, हा क्षण तिच्यासाठी खूप भयानक आणि भयावह होता. हेली बीबरने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिची एक गोष्ट शेअर केली आहे.
तिने लिहिले की, “गुरुवारी सकाळी मी माझ्या पतीसोबत नाश्ता करत असताना मला स्ट्रोकसारखी लक्षणे जाणवली. मला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी आढळले की, माझ्या मेंदूमध्ये खूप सौम्य रक्ताची गुठळी आहे. ज्यामुळे मला ऑक्सिजन मिळण्यास त्रास होत होता. परंतु काही तासांत मी पूर्णपणे बरी झाले. तो माझ्या आयुष्यातील खूप भयानक क्षण होता, पण आता मी घरी आली आहे.”
त्याचबरोबर तिने पुढे लिहिले आहे की, “मी सर्व डॉक्टर्स आणि नर्सेसचे आभार मानते, ज्यांनी माझी काळजी घेतली. मी त्या सर्व लोकांचे आभार मानते, ज्यांनी मला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा, समर्थन आणि प्रेम पाठवले.” हेलीने (Hailey Bieber) दोन हृदय इमोजीसह आपले बोलणे पूर्ण केले. याआधी गुरुवारी जस्टिन बीबरने (Justin Bieber) स्वतःचा आणि हेलीचा एक स्टायलिश फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये हेली निळ्या रंगाच्या आउटफिटसह काळ्या कोटमध्ये दिसली होती.
याआधी सुमारे महिनाभरापूर्वी जस्टिन बीबरलाही कोव्हिड-१९ चा फटका बसला आहे. जस्टिन आणि हेलीने २०१८ मध्ये लग्न केले. नंतर कुटुंब आणि मित्रांसह दोघांनी २०१९ मध्ये लग्न केले. या दोघांनी यापूर्वी डिसेंबर २०१५ ते जानेवारी २०१६ पर्यंत एकमेकांना डेट केले होते.
पण दोघांचे ब्रेकअप झाले. पण २०१८ मध्ये त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड सेलेना गोमेजसोबत ब्रेकअप झाल्यानंतर जस्टिन बीबर आणि हेली पुन्हा एकमेकांच्या जवळ आले आणि नंतर त्यांनी लग्न केले.
जस्टिन बीबरने अगदी लहान वयातच खूप प्रसिद्धी मिळवली आहे. अनेक मोठे कलाकार त्याच्यासमोर फिके पडताना दिसतात. जस्टिन बीबर वयाच्या १२ व्या वर्षापासून गात आहे. इतकेच नाही, तर युट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राइब करणारा जस्टिन पहिला पुरुष गायक आहे. याशिवाय फोर्ब्स मॅगझिननुसार, जस्टिन बीबरचा चार वेळा जगातील टॉप १० पॉवरफुल सेलिब्रिटींच्या यादीत समावेश झाला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :