Tuesday, July 9, 2024

Oops Moment | पूनम पांडेच्या ड्रेसने कॅमेऱ्यासमोरच दिला धोका, कसाबसा सावरला पण…

हिंदी चित्रपटसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात. या अभिनेत्री आपल्या बोल्ड फोटोमुळे, वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. असाच काहीसा प्रकार पूनम पांडे सोबत (Poonam Panday) घडलाय काय आहे, हे प्रकरण चला जाणून घेऊ.

अभिनेत्री पूनम पांडे आणि वाद हे प्रकरण काही नवीन नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने पूनम पांडे चर्चेचा विषय ठरत असते. तिच्या बोल्ड फोटोची, व्हिडिओची नेहमीच चर्चा पाहायला मिळते. सोशल मीडियावर सतत सक्रिय असणार्‍या पूनमच्या हॉट लूकची सुद्धा नेहमी चर्चा पाहायला मिळते. यावेळीही असाच हॉट लूक दाखवणे पूनमला चांगलेच महागात पडले आहे. कारण पूनम पांडे आपल्या अशाच एका ड्रेसमुळे अडचणीत आली आहे. इतकेच नव्हे, तर तिला टीकेचा सामना सुद्धा करावा लागला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये पूनमने ऑफशोल्डर बॉडीकॉन ड्रेस घातलेला दिसत आहे. हा ड्रेस खूपच सैल वाटत आहे. आपल्या केसाच्या मदतीने तो कसाबसा सांभाळला आहे. या व्हिडिओमध्ये पूनम कॅमेऱ्यासमोर बोलताना दिसत आहे. मात्र अचानक तिचा ड्रेस खाली सरकतो, ज्यामुळे पूनमची चांगलीच पंचाईत झाल्याचे पाहायला मिळाले. तिने कसा बसा हाताने हा ड्रेस ठीक करत, आपले बोलणे पूर्ण केले. मात्र काही काळ तिच्या चेहर्‍यावरचा रंग उडालेला पाहायला मिळाले होते.

सध्या पूनमचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. पूनम पांडेच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांनी जोरदार टीका केली आहे. प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते, अशा शब्दात त्यांनी समाचार घेतला आहे. त्याच बरोबर काही जणांनी चर्चेत राहण्यासाठी ती अशी कपडे घालते असेही म्हटले आहे.

अभिनेत्री पूनम पांडे याआधीही अनेकवेळा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. आपल्या ड्रेसमुळे तिला अनेकदा टीकेचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा

हे देखील वाचा