Thursday, April 17, 2025
Home बॉलीवूड मोहब्बते रिलीझ झाला अन् ‘ती’ एका रात्रीत स्टार झाली, पुढे मात्र वाद- अफेअर्स शिवाय आयुष्यात काहीच उरलं नाही

मोहब्बते रिलीझ झाला अन् ‘ती’ एका रात्रीत स्टार झाली, पुढे मात्र वाद- अफेअर्स शिवाय आयुष्यात काहीच उरलं नाही

किम शर्मा ही अभिनेत्री जरी आज मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, ती तिच्या वादांमुळे आजही लोकांच्या लक्षात आहे. शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांचा सुपरहिट सिनेमा ‘मोहब्बते’ मधून आपल्या करियरची सुरुवात करणारी किम भलेही चित्रपटांमध्ये यशस्वी झाली नाही, पण तिने तिच्या वादांमुळे भरपूर प्रसिद्धी मिळवली.
नुकताच किमने तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला.

किमचा जन्म २१ जानेवारी १९८० साली महाराष्ट्रातल्या, अहमदनगर मध्ये झाला. किमने ‘तुम से अच्छा कौन है’, ‘नहले पे दहला’, ‘कहता है दिल बार-बार’ आणि ‘जिंदगी रॉक्स’ अशा काही सिनेमांमध्ये काम केले. पण तिला काही खास यश मिळाले नाही. ती जास्त चर्चेत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे राहिली. नवऱ्याबरोबर घेतलेला घटस्फोट, युवराज सिंग सोबत अफेयर, कामवाल्या बाईला मारहाण अशा काही गोष्टींमुळे ती सतत बातम्यांमध्ये होती.

किम इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर २००३ साली तिच्या आणि युवराजच्या अफेयरच्या बातम्या यायला सुरुवात झाली. जवळपास चार वर्ष हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या अनेक बातम्या त्यावेळी आल्या होत्या. मात्र काही वर्षांनी या दोघांच्या नात्यात दुरावा आला, आणि त्यांनी २००७ साली ब्रेकअप केले.

त्यानंतर किमने २०१० उद्योगपती अली पंजानीसोबत लग्न केले, आणि मुंबई सोडून केनियामध्ये ती सेटल झाली. काही वर्षांनी तिच्या नवऱ्याने तिला दुसऱ्या मुलींसाठी सोडले. किम पुन्हा भारतात परत आली. मग तिचे नाव दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि डिझायनर अर्जुन खन्ना सोबत देखील जोडले गेले.

किम पुन्हा एकदा चर्चेत आली २०१८ साली, जेव्हा तिचे नाव अभिनेता हर्षवर्धन राणे सोबत जोडले गेले. या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले, पण येथेही तिला अपयश मिळाले आणि त्यांचे ब्रेकअप झाले. याचवर्षी किमवर तिच्या कामवाल्या बाईसोबत मारहाण केल्याचा आरोप झाला. बाईच्या म्हणण्यानुसार, ‘कपडे नीट धुतले नाही म्हणून किमने बाईला मारहाण करत घरातून बाहेर काढले आणि पगार देखील दिला नाही.’

किम पडद्यावर जरी हिट नसली तरी सोशल मीडियावर ती खूप हिट असून सक्रिय देखील आहे.

हे देखील वाचा