Friday, July 5, 2024

बाबो! चक्क ५ सिंहानी केला स्पर्धकावर हल्ला, बघ्यांनी घातली तोंडात बोटं

रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) स्टंट शो ‘खतरों के खिलाडी १२’चा (khatron ke khiladi season 12) प्रीमियर झाला आहे. यावेळी शोमध्ये पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक स्टंट पाहायला मिळत आहेत. यावेळी रोहित शेट्टी शोमध्ये दाखवलेले स्टंट पाहून तुमचीही तारांबळ उडेल. आता नुकतेच राजीव अडातिया (Rajeev Adatia) आणि मोहित मलिक (Mohit Malik) या शोमध्ये सिंहांशी स्पर्धा करताना दिसले. ऐकून आश्चर्य वाटले ना? या शोमध्ये स्पर्धक रांगडे, विंचू आणि सापासोबत स्टंट करताना दिसत आहेत. पण मोहित मलिक आणि राजीव अडातिया यांना सिंहांमध्ये राहून ही कामगिरी पार पाडावी लागली तेव्हा ते आणखी टोकाला गेले.

यावेळी राजीव अडातिया आणि मोहित मलिक खूपच नर्व्हस दिसले. जेव्हा मोहित आणि राजीव यांना बॉल शेपच्या पिंजऱ्यात सिंहांमध्ये सोडण्यात आले तेव्हा त्यांच्यासह उपस्थित असलेले सर्व स्पर्धक घाबरले. दोघांना पिंजऱ्यात टाकताच त्यांच्यावर ५ सिहांनी हल्ला केला. मोहित आणि राजीव यांच्यावर सिंहांनी हल्ला करताच, स्पर्धकाचे तोंड उघडेच राहिले. अलीकडेच या धोकादायक स्टंटबद्दल बोलताना मोहित मलिकने मुलाखतीत सांगितले आहे की, “मला आशा आहे की माझा मुलगा एकबीरला हा स्टंट खूप आवडेल, कारण माझ्या मुलाला सिंह पाहायला आवडतात.” (mohit malik battle with lion see khatron ke khiladi 12 shocking stunt viral)

मोहितसाठी खूपच धोकादायक होता स्टंट
सिंहांसोबत स्टंट करणे खूप भीतीदायक होते. मोहित पुढे म्हणाला की, दक्षिण आफ्रिकेचे सिंह खूप मोठे आणि शक्तिशालीही आहेत. असे स्टंट करण्याचा अनुभव त्याच्यासाठी खूप छान असल्याचेही अभिनेत्याने सांगितले. या स्टंटबद्दल बोलताना मोहितने असेही सांगितले की, तेथे मांस ठेवण्यात आले होते, त्यामुळे तो एक इंचही हलू शकत नव्हता. एवढेच नाही तर सिंहाने पिंजऱ्यात आपला पंजा टाकला होता.

गोठला होता मोहित मलिक
त्यादरम्यान मोहित १५ सेकंद गोठताना दिसला आणि त्याला अजिबात हालचाल करता येत नव्हती. मोहित म्हणाला, की त्याच्यासाठी हा अनुभव मॅन व्ही/एस वाइल्डसारखा होता आणि तो पुढे जाण्यासाठी लढत होता आणि पण सिंग त्याला अजिबात पुढे जाऊ देत नव्हते. असे स्टंट करणे अजिबात सोपे नव्हते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा