‘देवों कें देव महादेव’ बनून घराघरांत पोहोचला मोहित रैना, जाणून घ्या काही रंजक किस्से…

मोहित रैनाने ‘देवों के देव महादेव’मध्ये भगवान शिवाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. या भूमिकेमुळे तो टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता बनला. शोमधील त्याच्या अभिनयाचे आणि त्याच्या अभिनयातील खोलीचे कौतुक झाले. आज मोहित रैनाचा वाढदिवस आहे. चला, या निमित्ताने जाणून घेऊया या अभिनेत्याशी संबंधित अशा गोष्टी, ज्या कदाचित तुम्हाला माहीत नसतील.

मोहित रैना (Mohit Raina) आज १४ ऑगस्ट रोजी ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. ‘देवों के देव महादेव’ व्यतिरिक्त, ‘बंदिनी’, ‘२१ सरफरोश – सारागढ़ी १८९७’, ‘चक्रवर्ती अशोक सम्राट’ सारख्या शोमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारण्यासाठी अभिनेता ओळखला जातो.

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात मोहित रैनाने आपल्या दमदार अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्याला बॉलीवूडमध्ये यशही मिळाले. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्त्याने अशाच काही गोष्टी जाणून घेऊया.

मोहित रैनाचा जन्म जम्मूमध्ये झाले.त्याचा जन्म १४ ऑगस्ट १९८२ रोजी जम्मूमध्ये झाला. मोहित रैना वडिलांचे नाव पी. एल. रैना आहे, तर त्याच्या आईचे नाव सुषमा कुमारी आहे. जम्मूच्या केंद्रीय विद्यालयात त्याने आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. अभिनेत्याने जम्मू विद्यापीठातून पदवीचे शिक्षण देखील पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मोहित करिअर करण्यासाठी मुंबईला आला. तो खऱ्या आयुष्यात लाइम लाईटपासून दूर राहणे पसंत करतो.

मोहितचे वजन आधी १०७ किलो होते. अभिनयात करिअर करण्यासाठी त्याने ३० किलो वजन कमी केले होते.

 

View this post on Instagram

 

मोहित रैनाने २००५ मध्ये ग्रासिम मिस्टर इंडिया मॉडेलिंग स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये तो टॉप ५ स्पर्धकांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला.

मोहित रैना अभिनेता होण्यापूर्वी हुंडाई मोटर्समध्ये काम करत होता. त्याला कार विकण्याचे काम देण्यात आले होते.

मोहितने २००६ ते २००७ मध्ये ‘अंतरीक्ष’ या टेलिव्हिजन शोमधून आपल्या अभिनयाचे कारकिर्दीला सुरुवात केली.

mohit raina
Photo Courtesy : Instagram/merainna

मोहितने ‘डॉन मुथू स्वामी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर, २०१९ मध्येच, तो ‘काफिर’ मध्ये देखील दिसला. अभिनेता मोहित रैना वेब सीरीजमध्येही सक्रिय आहे, तो नुकताच ‘भौकाल’ या सीरीजमध्ये दिसला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

जॉनी लिव्हर यांचे खरे नाव आहे ‘जॉनी राव’, जाणून घ्या कसे बनले ‘लिव्हर’

‘हा’ दिग्गज अभिनेता नसता, तर बॉलिवूडला मिळाला नसता ‘कॉमेडीचा बादशाह’ जॉनी लिव्हर; वाचा त्यांचा रंजक प्रवास

भारीच ना! विमानतळावर वरुणने पत्नीसह घेतली टीम इंडियाची भेट, एका धवनने दुसऱ्या धवनला पाडले कोड्यात