Friday, October 17, 2025
Home बॉलीवूड घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये ‘या’ अभिनेत्याने शेअर केली बाबा झाल्याची आनंदाची बातमी, पोस्ट केला बाळाचा फोटो

घटस्फोटाच्या बातम्यांमध्ये ‘या’ अभिनेत्याने शेअर केली बाबा झाल्याची आनंदाची बातमी, पोस्ट केला बाळाचा फोटो

टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील आणि बॉलिवूडमधील अभिनेता मोहित रैना नुकताच बाबा झाला आहे. त्याची पत्नी असलेल्या आदिती शर्माने एका मुलीला जन्म दिला आहे. मोहित रैनाने सोशल मीडियावर त्याच्या छोट्या परीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी आणि सेलिब्रिटींनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

मोहित रैनाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या मुलीचा फोटो पोस्ट केला आहे. मात्र त्याने या फोटोमध्ये तिचा चेहरा दाखवला नाही. या फोटोमध्ये तो त्याच्या मुलीचा छोटा हात पकडून आहे. या फोटोसोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले “आणि आम्ही असेच तीन झालो. या जगात बेबी गर्लचे स्वागत आहे.” यासोबत त्याने हार्ट ईमोजी देखील पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohit Raina (@merainna)

मोहितच्या या फोटोवर कमेंट करताना दिया मिर्झाने लिहिले, ‘अभिनंदन’, यासोबतच अनेक कलाकार आणि फॅन्स त्याला अभिनंदन करत बाळाला आशीर्वाद देत आहे. यासोबतच त्याच्या काही फॅन्सने त्याला लवकरच बाळाचा चेहरा दाखव अशी विनंती देखील केली आहे. मोहितने बाबा होणार असल्याचे लपवून ठेवत थेट मुलगी होऊन बाबा झाल्याची बातमी सर्वांना दिल्यामुळे अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केले आहे.

दरम्यान काही काळापूर्वी मोहित रैना आणि आदिती शर्मा यांच्या लग्नाबद्दल अनेक बातम्या आल्या होत्या. त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाल्यामुळे ते घटस्फोट घेणार असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र नंतर मोहितने एका मुलाखतीमध्ये या सर्व अफवा असल्याचे सांगितले होते. त्याने मोठ्या आनंदाने त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला असल्याचे देखील सांगितले.

दरम्यान मोहित रैनाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये ‘देवो के देव महादेव’ मालिकेत महादेवाची भूमिका साकारत अमाप लोकप्रियता मिळवली. त्याला महादेव म्हणूनच आजही अनेक लोक ओळखतात. दरम्यान त्याने बॉलिवूडमध्ये ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमातून पदार्पण केले. पुढे त्याने ‘काफिर’, ‘भौकाल’, ‘मुंबई डायरीज 26/11’ आदी सिनेमे आणि वेबसिरीज देखील केल्या.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भारतातील मुलींच्या लग्नाच्या अवाजवी अपेक्षेवर सोनाली कुलकर्णी म्हणाली “मुलगा हवाय की मॉलमधील ऑफर?

स्वराच्या कव्वाली नाईट फंक्शनमध्ये पोहोचले अखिलेश यादव, अभिनेत्री पाेस्ट शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा