Sunday, July 14, 2024

अभिनेत्री मोनालिसाच्या पुन्हा एकदा सोशल मीडियावर जलवा, शॉर्ट ड्रेसमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

भोजपुरी चित्रपटसृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा सुंदर अभिनेत्रींचा उल्लेख होतो, तेव्हा अभिनेत्री मोनालीसाचे नाव सगळ्यात टॉपच्या अभिनेत्रींमध्ये असते. मोनालिसाची गणना भोजपुरी चित्रपटसृष्टीमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रींमध्ये होते. ती तिचे अनेक वेगवेगळे फोटो शेअर करून तिच्या सौंदर्याचे दर्शन प्रेक्षकांना देत असते. अनेक भोजपुरी चित्रपटात काम केल्यानंतर मोनालिसा आता टेलिव्हिजनवर काम करू लागली आहे.

तिने टेलिव्हिजन दुनियेत देखील वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे सगळे दीवाने आहेत, पण त्यासोबत ती चर्चेत असते, तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे. आता देखील तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या व्हिडिओमध्ये मोनालिसा काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मोनालिसा शॉर्ट्स घालून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे.

हा मोनालिसाचा एक रील व्हिडिओ आहे, जो चाहत्यांना खूप पसंत केला जात आहे, त्यामुळेच काही तासांत हजारो लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे, तर चाहते या व्हिडिओवर सतत कमेंट करत आहेत. मोनालिसा आणि तिचा पती विक्रांत आजकाल टीव्ही रिअॅलिटी शो स्मार्ट जोडीमध्ये दिसत आहेत.

मोनालिसा ही ‘बिग बॉस १०’ ची स्पर्धक होती, तेव्हा तिने तिचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंग राजपूत याच्याशी २०१७ मध्ये बिग बॉसमध्येच लग्न केले होते. त्यावेळी देखील ती खूपच चर्चेत होती. तिने ‘ब्लॅकमेल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने ‘नजर’ आणि ‘नजर २’ या मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा