Saturday, July 6, 2024

सतत प्रयत्न करूनही ‘या’ कामात मोनालिसा ठरली अपयशी; स्वतःला ‘लूजर’ म्हणत शेअर केला व्हिडिओ

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. सतत बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करत, ती चाहत्यांशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. तिचे चाहतेही तिच्या पोस्टची प्रतीक्षा करत असतात. अलीकडेच अभिनेत्रीने कोरोनावर मात केली आहे. पण एका व्हिडिओमध्ये मोनालिसाने स्वतःचे ‘लूजर’ म्हणून वर्णन केले आहे.

मोनालिसाने अलीकडेच तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती सायकल चालविण्याचा प्रयत्न करत आहे. सतत प्रयत्न करूनही ती सायकल चालविणे शिकू शकली नाही, म्हणून तिने स्वतःला अपयशी म्हणण्यास सुरुवात केली. यामुळे अभिनेत्रीचे चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, अभिनेत्री तिच्या घराच्या अंगणात सायकल चालवत संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु असंख्य प्रयत्न करूनही, तिला सायकल चालवता येत नाही. ती सतत सायकल चालविण्याचा प्रयत्न करत असते, परंतु हा प्रयत्न यशस्वी होत नाही.

 

हा व्हिडिओ शेअर मोनालिसाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “ही खरोखरच लूजर आहे. बऱ्याच वेळा प्रयत्न करूनही हे होऊ शकले नाही. सायकल प्रॅक्टिसचा हा पहिला दिवस.” मोनालिसाच्या या व्हिडिओवर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया येत आहेत. तसेच चाहत्यांद्वारे व्हिडिओ सतत पाहिला जात आहे.

‘बिग बॉस’मध्ये भाग घेतल्यानंतर मोनालिसाला खूप प्रसिद्धी मिळाली. याच शोमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्नही केले होते. त्यांचे हे लग्न त्यावेळी खूप चर्चेत होते. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मोनालिसा सध्या टीव्ही सीरियल ‘नमक इश्क का’ मध्ये काम करत आहे.

 

हे देखील वाचा