मोनालिसाने बोल्ड फोटो शेयर करत सकाळी सकाळी लावली सोशल मीडियावर आग


भोजपुरी चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री मोनालिसा म्हणजेच अंतरा बिस्वास. मोनालिसा तिच्या बोल्ड इमेजसाठी सर्वत्र ओळखली जाते. सोशल मीडियावर सक्रिय असणारी मोनालिसा नेहमी तिचे नवनवीन फोटो फॅन्ससाठी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिवाय तिचे अनेक भोजपुरी अल्बम देखील प्रचंड गाजतात.

मोनालिसाच्या नुकतेच तिचे सुंदर फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटोशूट प्रचंड गाजत आहे. तिच्या या फोटोशूटचे फोटो खूप वायरल होत असून त्या फोटोंना तिच्या फॅन्सकडून भरभरून लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहे.

पांढऱ्या रंगाचा टॉप आणि शॉट्स घातलेल्या मोनालिसाचे हे फोटो बेडरूममध्ये शूट करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये मोनालिसा अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत ती तिच्या फॅन्सला गुड मॉर्निंग म्हणत आहे.

मोनालिसा बहुतकरून भोजपुरी सिनेमांमध्ये सक्रिय असते. तिने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त भोजपुरी सिनेमांमध्ये काम केले.  भोजपुरीसोबतच तीने हिंदी, बंगाली, ओडिया, तामिळ, कन्नड़ आणि तेलुगू भाषेतही कमी केले आहे.

मोनालिसाचे फॅन्स फक्त भोजपुरी किंवा हिंदीपुरते मर्यादित नसून संपूर्ण जगात तिचे फॅन्स आहेत. मोनालिसाचे इंस्टाग्रामवर ४० लाखांपेक्षा जस्ट फॉलोवर्स असून ती नेहमी तिच्या फॅन्सच्या संपर्कात असते. मोनालिसाच्या हिंदीमध्ये ‘नजर’ या मालिकेत देखील काम केले आहे. ही मालिका प्रचंड हिट झाली होती. सध्या मोनालिसा तिच्या नवीन ‘नमक इस्क का’ मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे.

मोनालिसाने बिग बॉसच्या १० व्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या शोने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या शो मधेच तिने तिच्या बॉयफ्रेंड विक्रांत सिंग सोबत लग्न केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.