तब्बल २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले आहे की, सुकेशने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandes) ला शेखर रत्न वेला म्हणून ओळख दिली. सुकेशने आधी डिसेंबर २०२० आणि नंतर जानेवारी २०२१ मध्ये अभिनेत्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. पण ती त्याला ओळखत नसल्याने त्यांच्या कॉलला प्रतिसाद देत नव्हती. तपास एजन्सीच्या म्हणण्यानुसार, सुकेशने नंतर जॅकलिनशी तिचा मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिलच्या माध्यमातून संपर्क साधला.
मिळालेल्या माहितीनुसार, मेकअप आर्टिस्टला सरकारी अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीचा कथित फोन आला होता, ज्याने अभिनेत्रीने शेखर रत्न वेला यांच्याशी संपर्क साधावा, जी ‘महत्त्वाची व्यक्ती’ आहे, असे सांगितले होते. या प्रकरणात एजन्सीला दिलेल्या निवेदनात जॅकलिनने सांगितले की, सुकेश चंद्रशेखरने तिला हिऱ्याच्या कानातले, दोन हर्म्स ब्रेसलेट, तीन बिर्किन बॅग आणि लुई व्हिटॉन शूजचा एक जोड दिला होता.

याशिवाय २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश याने अभिनेत्रीला जिममध्ये घालण्यासाठी दोन गुच्ची पोशाख आणि एक बहुरंगी ब्रेसलेटही भेट दिले होते. तसेच पीएमएलए कायद्याच्या कलम ५० अन्वये नोंदवलेल्या आपल्या जबाबात सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्रीला कानातल्यांचे १५ जोड, पाच बिर्किन बॅग आणि चॅनेल, गुच्चीच्या इतर लक्झरी वस्तू दिल्याचे सांगितले आहे.
सुकेशने असा दावाही केला की, त्याने जॅकलिनला कार्टियर ब्रेसलेट आणि अंगठ्या, रोलेक्स घड्याळे व्यतिरिक्त टिफनी कंपनीचे ब्रेसलेट भेट दिले. यासोबतच आरोपीने जॅकलिनला सात कोटी रुपयांचे दागिने आणि ‘एस्पुएला’ नावाचा घोडाही भेट दिल्याचे कबूल केले आहे.
याशिवाय सुकेशने अमेरिकेत राहणाऱ्या जॅकलिनच्या बहिणीला १५०,००० डॉलरचे कर्जही दिले. यासोबतच त्याने अभिनेत्रीच्या बहिणीला बीएमडब्लू एक्स 5 कारही भेट दिली. सुकेशने जॅकलिनच्या आई-वडिलांना मासेराटी आणि तिच्या आईला एक पोर्शही दिली. एवढेच नाही, तर त्याने ऑस्ट्रेलियात जॅकलिनच्या भावाला ५० हजार डॉलर्सचे कर्जही दिले.
त्याचवेळी जॅकलिनने ईडीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुकेशने सन टीव्हीचा मालक म्हणून स्वतःची ओळख करून दिली. दरम्यान, सुकेशने दावा केला की, तो तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्या ‘राजकीय कुटुंबाचा’ भाग आहे. सुकेशने अभिनेत्रीला असेही सांगितले की, तो तिचा खूप मोठा चाहता असून तिने दक्षिणेत तिच्याद्वारे तयार केलेल्या चित्रपटांचा भाग असण्याची इच्छा व्यक्त केली होती.
जॅकलिन फर्नांडिसने असेही उघड केले की, ती लक्झरी ब्रँडच्या शोरूमला भेट देत होती. उत्पादनांची ओळख पटल्यानंतर या उत्पादनांची यादी सुकेश चंद्रशेखरला पाठवत असे. सुकेश या वस्तूचे पैसे देत होता आणि हे उत्पादन त्याच्यापर्यंत थेट किंवा त्याच्या कोणत्याही सहयोगीमार्फत पोहोचवत असे. ईडीच्या तपासादरम्यान सुकेश चंद्रशेखरने यावर्षी २० ऑक्टोबर रोजी जॅकलिन फर्नांडिसची भेट घेतली होती. या संभाषणात सुकेशने जॅकलिन फर्नांडिसने ईडीला दिलेल्या आधीच्या वक्तव्याशी सहमती दर्शवली होती.
हेही वाचा-
पवन सिंग आणि अक्षरा सिंगने बर्फाळ मैदानात आपल्या रोमान्सने लावली आग
एका चापटीने बदलवले होते हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर यांचे नशीब, कमी वयातच मिळाली ‘शोमॅन’ ओळख
समुद्राच्या पाण्यात चील मारताना दिसली इलियाना डिक्रुझ, मालदीवमधील फोटो आले समोर