बॉलिवूड अभिनेत्री मोनिका बेदी आज तिचा ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मोनिकाने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, मात्र तरीही मोनिका तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा पर्सनल आयुष्यामुळे जास्त प्रसिद्ध झाली. मोनिकाने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले.
तिने हिंदी सोबतच तामिळ, कन्नड, बंगाली, नेपाळी भाषांच्या सिनेमातही काम केले. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिची आणि अबू सालेमची लव्हस्टोरी.
बॉलिवूडच्या मोठ्या अभिनेत्रींमध्ये सामील होणाऱ्या मोनिकाच्या जन्म १८ जानेवारी १९७५ ला झाला. मोनिकाने अनेक हिट चित्रपटांमध्ये, मोठ्या दिग्दर्शक, अभिनेत्यांसोबत काम केले. करियरच्या शिखरावर असतानाच मोनिकाचे नाव अंडरवर्ल्डसोबत जोडले जाऊ लागले. याच कारणामुळे मोनिकाचे करियर हळूहळू अस्ताकडे सरकू लागले. मोनिका आणि अबू सालेम यांचे प्रेमकहाणी तर सर्वश्रुत आहे.

एका मुलाखतीदरम्यान खुद्द मोनिकानेच तिची लव्हस्टोरी सांगितली होती. मोनिका म्हणाली, “ अभिनेत्री असल्याने मला अनेकदा स्टेज शो करण्याच्या ऑफर्स यायच्या. मी अंडरवर्ल्ड सरगना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांची नावे तर ऐकली होती पण मला अबू सालेम बद्दल माहिती नव्हती.”
“सन १९९८ साली मी पहिल्यांदाच अबू सालेमसोबत फोनवर बोलली. त्यावेळी मी दुबईमध्ये होती, आणि मला दुबईमध्ये स्टेज शी साठी ऑफर आली. या स्टेज शो दरम्यान अबूने मला तो एक बिझनेसमॅन असल्याचे मला सांगितले. या शो आधी तो माझ्याशी त्याचे नाव बदलून बोलायचा. त्याचा बोलण्याचा अंदाज इतका वेगळा आणि आकर्षक होता की, आमच्या भेटीच्या आधीच मला तो आवडायला लागला होता.”
“आमच्या फोनवरच्या बोलण्यावरून मला नेहमी वाटायचे की आमच्यात काहींना काही कनेक्शन आहे. खरं सांगायचे तर मी कधीच असा विचार केला नव्हता की, मला एक न पाहिलेला माणूस इतका आवडायला लागेल ज्याच्या फोनशिवाय माझा दिवसच पूर्ण होत नव्हता.”
“मी त्याच्या प्रेमात नव्हते पडले पण हो मला तो नक्कीच आवडायला लागला होता. दिवस उजाडला की मी त्याच्या फोनची वाट पाहायची, फोन आला नाही तर काही तरी वेगळे वाटायचे. फोनवर बोलताना मला तो नेहमीच खूप हळवा आणि हुशार वाटायचा. मी माझ्या अनेक वैयक्तिक गोष्टी त्याच्यासोबत शेयर करू लागली. दुबईमधला शो झाल्यानंतर आम्ही अधिक जवळ आलो.”

“त्याला माझी खूप काळजी असायची. मी दुबईमध्ये शो केल्यानंतर मी मुंबईला आली, त्याच्यानंतर त्याला अनेकवेळा मी मुंबईला बोलवले पण त्याने नेहमी काहीतरी कारण करून ते टाळले. त्याने त्याचे नाव मला अर्सलान अली सांगितले होते. तो नेहमी हेच नाव वापरायचा, आम्हाला पोर्तुगालमध्ये अटक झाली, तेव्हा देखील त्याने हेच नाव सांगितले होते. अबुल मी दुबईसोडून मुंबईत आलेले चालत नव्हते.”
“मी मुंबईत असताना त्याने मला दुबईला यायला सांगितले, आणि म्हणाला की मी जर मुंबईत राहिली तर खूप प्रश्न निर्माण होतील. मी दुबईला गेले, तेव्हा तेव्हा तो म्हणाला की आता मी पुन्हा मुंबईमध्ये नाही जायचे. तू जर मुंबईला गेली तर पोलीस तुझ्याकडे माझ्याबद्दल माहिती मागतील.”
“अबूला लोकं काय म्हणून ओळखता हे मला तेव्हा माहित नव्हते, पण तो माझ्यासाठी एक सामान्य माणूस होता. तो नेहमी गरीब लोकांना मदत करायचा, त्याने कधीच मला त्याच्याबद्दल खरी माहिती दिली नव्हती. मला माहित नव्हते तो खरा कोण आहे, माझ्यासोबत तो नेहमीच चांगला वागायचा.”
“तो इतरांसाठी काय होता, त्याचे खरे काम काय होते हे मला काहीच माहित नव्हते. तो माझ्यासाठी खूप खास होता. थोडे दिवस सोबत राहिल्यानंतर मला जाणवायला लागले की आम्ही एकमेकांसाठी पार्टनर म्हणून योग्य नाही. मी त्याच्यासोबत आयुष्यभर नाही राहू शकत पण तो हि गोष्ट समजून घ्यायला तयारच नव्हता. मग तो वाईट दिवस उजाडलाच १८ सप्टेंबर २०२० ज्या दिवशी त्याला आणि मला पोर्तूगालमधे अटक झाली.”

मोनिकाला खोट्या पासपोर्ट बाळगल्या प्रकरणी अटक झाली. मोनिकाने तिची चार वर्षाची शिक्षा पूर्ण केली. तोपर्यंत तिची फॅमिली नॉर्वेला शिफ्ट झाली होती. त्यानंतर मोनिकाने अभिनयात पुन्हा पदार्पण केले ती बिग बॉस, सरस्वतीचंद्र आदी टेलिव्हिजनच्या कार्यक्रमांमध्ये दिसली.
मोनिकाच्या म्हणण्यानुसार अबूसोबत काही वर्ष राहूनही त्यांनी कधी लग्न केले नाही, मात्र अबूच्या म्हणण्यानुसार त्यांनी २००० साली अमेरिकेत लॉस एंजेलिसमध्ये लग्न केले होते. मागील बऱ्याच काळापासून मोनिका अभिनयपासून दूर आहे.