Saturday, June 15, 2024

‘तारक मेहता…च्या सेटवर इतका छळ झाला की..’, ‘तारक मेहता…’च्या ‘बावरी’ने केला धक्कादायक खुलासा

छोट्या पडद्यावर सर्वाधिक काळ चालणाऱ्या शोमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे नाव घेतले जाते. हा शो 2008 साली चालू झाला असुन आजतागायत हा शो सुरु आहे. म्हणजेच तब्बल 14 वर्षे हा शो सुरू आहे. हा भारतातील सर्वाधिक काळ चालणारा हिंदी टीव्ही शोमधील हा एक शो आहे. मागील काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका विविध कारणामुळे चर्चेत येत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हा शो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांनी काही आरोप केले होते. त्यानंतर अभिनेत्री जेनिफर मिस्त्री (Jennifer Mistry) हिने शोच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर सगळीकडे एकच धमाका झाला. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) अनेक दिवसांपासून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. आपल्या वेगळ्या कथेसाठी प्रसिद्ध असलेला हा शो सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री जेनिफर मिस्त्रीनंतर आता शोमध्ये ‘बावरी’चे पात्र साकारलेल्या मोनिका भदोरियाने (Monika Bhadoriya) निर्माते असित कुमार मोदीवर आरोप केले आहेत.

काही आठवड्यांपूर्वी मोनिका देखील जेनिफरला सपोट करताना दिसली. आता माध्यमांशी संवाद साधताना मोनिका म्हणाली की, “जेव्हा मी शो सोडला तेव्हा माझ्यासोबत कोणीही आले नव्हते. यानंतर मी मीडियाशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी माझी कागदावर सही घेतली आणि म्हणाले की, तुम्ही असे केले नाही तर तुम्हाला तुमचे मानधन मिळेल, अन्यथा पैसे विसरा.”

मोनिकाने पुढे म्हणाली की, “माझ्या आई-वडिलांना माझ्या शोच्या सेटवर आणणे हे माझे स्वप्न होते, पण सेटवरील वातावरण पाहून मी ठरवले की मी माझ्या आई-वडिलांना कधीही सेटवर येण्यास सांगणार नाही.” तसेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवरील प्रत्येकाच्या वागणुकीला आणि टोमण्यांमुळे मी खूप खचून गेली होती. त्यामुळे माझी शोमध्ये काम करण्याची इच्छा कमी झाली होती, असे ही तिने सांगितले. या दरम्यान, शोमध्ये मोनिका बावरीच्या भूमिकेत दिसली होती. निर्मात्यांशी मतभेद झाल्यामुळे तिने 2019च्या मध्यात शो सोडला. (Monica Bhadoria’s big allegation on the makers of Taarak Mehta)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
SHYAM PATHAL BIRTHDAY | खऱ्या आयुष्यात पोपटराव नाहीये अविवाहित, थाटात केलाय प्रेमविवाह
NEHA KAKKAR BIRTHDAY | चाळीतील एका खोलीत काढलेत दिवस, आज आहे करोडोंची मालकीण

हे देखील वाचा