‘रॉक ऑन’ फेम अभिनेत्री आणि गायिका मोनिका डोग्रा (Monica Dogra) नेहमीच तिच्या लैंगिक इच्छा आणि अशा समस्यांबद्दल बोलते. अमेरिकेत जन्मलेली मोनिका आता एका मुलाखतीत तिच्या लैंगिकतेबद्दल उघडपणे बोलली आहे. तिने आपण पॅनसेक्सुअल असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही, तर मोनिका डोग्राने या संवादात तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असे काही खुलासे केले आहेत, जे ऐकून कोणीही स्तब्ध होईल. अभिनेत्रीने सांगितले की, तिच्या लहानपणी तिच्या चुलत भावांनी तिचा अनेकदा विनयभंग केला. एवढेच नाही, तर एका मित्राने तिला चुकीच्या ठिकाणी स्पर्श केला. मोनिका म्हणते की, ती घाबरलेल्या विचित्र मुलीसारखी मोठी झाली. यादरम्यान मोनिकाने तिच्या तुटलेल्या लग्नाबद्दलही सांगितले.
साल २००८ मध्ये आलेल्या ‘रॉक ऑन’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या मोनिका डोग्राने किरण रावच्या ‘धोबी घाट’ चित्रपटातही काम केले होते. दिलेल्या एका मुलाखतीत ती म्हणाली, “तुम्ही कोण आहात हे देखील तुम्हाला माहीत नसेल, तर स्वत:वर प्रेम करणे कठीण आहे आणि हे शब्द माझ्यासोबत राहतात.” गायिका आणि अभिनेत्री मोनिकाने गेल्या वर्षीच ती पॅनसेक्सुअल असल्याचे सांगितले होते. मोनिका डोग्राने लैंगिकतेच्या खांद्याला खांदा लावून २०१६मध्ये LGBTQ साठी क्राउडफंडिंग मोहीम चालवली होती. आता मोनिकाने तिच्या बालपणीच्या विनयभंगाबद्दल सांगितले आहे. (monica dogra opens up on pansexuality)
काय असतं पॅनसेक्सुअल?
सोप्या शब्दात जाणून घ्यायचे असेल, तर पॅनसेक्सुअल असण्याचा अर्थ लैंगिकतेशी आहे. ज्याला प्रेम किंवा सेक्ससाठी कोणत्याही विशिष्ट लिंगाची आवश्यकता नसते. अशा व्यक्तीला मुलगा, मुलगी, गे, लेस्बियन, स्ट्रेट, क्वीर, कोणत्याही लिंग किंवा कोणत्याही प्रकारच्या लैंगिकतेच्या प्रेमात पडायला हरकत नाही. त्यांच्यासाठी, फक्त व्यक्ती महत्त्वाची आहे, त्याची लैंगिकता किंवा लिंग नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा