Saturday, July 6, 2024

खर कौतुक मेल्यानंतरच होत! हत्येनंतर रिलीज झालेले सिद्धू मूसेवालाचे गाणे तुफान व्हायरल, इतक्या लोकांनी पाहिला व्हिडिओ

लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या (Siddhu Moosewala) हत्येने संपूर्ण मनोरंजन जगताला मोठा धक्का बसला होता. प्रचंड लोकप्रियता आणि एक प्रतिभावान गायक असलेल्या सिद्धूच्या हत्येने संपूर्ण सिने जगतावर शोककळा पसरली होती. या बातमीने सिद्धूच्या चाहत्यांना तर धक्का बसलाच परंतु मनोरंजन जगतातही अनेकांनी सिद्धूच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली होती. मृत्यूनंतर आता पहिल्यांदाच सिद्धूचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे ज्याला त्याच्या चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. 

पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या निधनानंतर 25 दिवसांनी गायकाचे पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. अर्ध्या तासात हे गाणे दहा लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आणि ऐकले, यावरून मूसवालाची फॅन फॉलोइंग किती आहे हे समजू शकते. हे गाणे पंजाब-हरियाणाच्या विवादित सतलज यमुना लिंक कालव्या (SYL) मुद्द्यावर गायले आहे.

सिद्धूच्या मृत्यूनंतर त्यांच्या टीमने अपूर्ण प्रकल्प सिद्धूच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. अलीकडेच, सोशल मीडियाच्या माध्यमातून टीमने सांगितले की, त्यांच्या कुटुंबाने हे गाणे रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब आणि हरियाणामधील सर्वात मोठा वाद असलेल्या सतलज यमुना लिंक कालव्यावर (एसवायएल) हे गाणे आहे. सिद्धूच्या टीमने काल रात्री सिंगरच्या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली. गाण्याचे पोस्टर शेअर करताना टीमने लिहिले की, “SYL उद्या संध्याकाळी 6 वाजता सिद्धू मूसवालाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर रिलीज होईल.” हे गाणे सिद्धूने गायले आहे, लिहिले आहे आणि संगीतबद्ध केले आहे.

सिद्धूचे हे गाणे पंजाब आणि हरियाणातील सर्वात मोठ्या सतलज यमुना लिंक कालवा SYL वादावर आहे. या गाण्यात मूसावालाने या वादग्रस्त मुद्द्यावर आपलं विचार खास शैलीत बोलून दाखवलं आहे. मुसेवालाने एसवायएल कालव्याचा मुद्दा उपस्थित करत पंजाबकडे कोणाला द्यायला पाणी नाही, असे सांगितले. त्याचबरोबर या गाण्यात तुरुंगात डांबलेल्या शिखांच्या सुटकेच्या मुद्द्याचाही उल्लेख आहे. सिद्धूच्या मृत्यूनंतर त्याची गाणी रिलीज केली जातील असे त्याच्या वडीलांनी सांगितले होते.   त्याचवेळी आपल्या मुलाला चार-पाच वर्षे जिवंत ठेवण्याचा आपला प्रयत्न असेल असेही त्यांनी सांगितले होते. त्यांची गाणी हळूहळू रिलीज होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांनंतर त्याची गाणी रिलीज करण्याबाबत कुटुंबीयांनी चर्चा केली आहे.

अलीकडेच, सिद्धूच्या ‘295’ गाण्याने बिलबोर्ड ग्लोबल 200 चार्टमध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत फार कमी भारतीय कलाकार सामील होऊ शकले आहेत. बिलबोर्ड ग्लोबल 200 मध्ये सिद्धूचे गाणे 154 व्या क्रमांकावर आहे. हॅरी स्टाइल्स, बॅड बनी, लिझो, कॅमिला कॅबेलो, एड शीरन आणि जस्टिन बीबर हे देखील बिलबोर्ड ग्लोबल 200 च्या यादीत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘हाच खरा हाय वाघ…’ अभिनेत्री हेमांगी कवीच्या ‘त्या’ दोन फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

Viral Video: अभिनेत्री अमिषा पटेलच्या बोल्डनेसचा कहर, व्हायरल व्हिडिओने केले नेटकऱ्यांना घायाळ

हरियाणाच्या डान्सिंग क्वीनला मिळाली डॉक्टरेट पदवी, सन्मानानंतर सपना चौधरीने विद्यार्थ्यांसाठी घेतला ‘हा’ कौतुकास्पद निर्णय

 

 

हे देखील वाचा