Monday, July 1, 2024

‘श्रीवल्ली’पासून ते ‘छम्मक छल्लो’पर्यंत, ‘या’ गाण्यांवर खर्च झाले आहेत करोडो रुपये

चित्रपटसृष्टीत मोठ्या बजेटचे चित्रपट बनवणे सामान्य गोष्ट आहे. परंतु आता निर्माते गाण्यांवरही करोडो रुपये खर्च करताना दिसतात. चित्रपटात गाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. अशा परिस्थितीत, निर्माते गाण्यांच्या शूटिंगसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. कधीकधी या गाण्यांचे बजेट इतके मोठे असते की, त्या बजेटमध्ये संपूर्ण चित्रपट बनू शकतो. आज या आम्ही तुम्हाला अशा गाण्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च झाले आहेत आणि ते आतापर्यंतच्या सर्वात महागड्या गाण्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. (most expensive songs from bollywood)

तु ही रे
रजनीकांत (Rajinikanth) यांच्या ‘२.०’ चित्रपटातील हे गाणे आतापर्यंतचे सर्वात महागडे गाणे आहे. या चित्रपटात रजनीकांत रोबोटच्या अवतारात दिसले होते, तर अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि एमी जॅक्सन (Amy Jackson) यांनीही या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, हे गाणे बनवण्यासाठी २० कोटी रुपये खर्च आला होता. यात उत्कृष्ट VFX वापरले गेले आणि चार वेगवेगळ्या सेटवर १० दिवसात शूट केले गेले.

ऊ अंटवा
‘पुष्पा : द राइज’ मधील या गाण्यात समंथा रुथ प्रभूचा (Samantha Ruth Prabhu) बोल्ड अवतार पाहायला मिळाला, ज्याला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. ‘ऊ अंटवा’मधील अल्लू अर्जुनसोबत (Allu Arjun) समंथाचा डान्स आणि केमिस्ट्रीने सर्वांनाच थक्क केले. या गाण्याचे हिंदी व्हर्जनही हिट ठरले. या गाण्याची किंमत ६.५० कोटी होती.

श्रीवल्ली
‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ या गाण्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि ते हिट ठरले. हे गाणे जावेद अलीने (Javed Ali) गायले होते. रिपोर्ट्सनुसार, हे गाणे बनवण्यासाठी ५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

पार्टी ऑल नाइट
अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘बॉस’मधील ‘पार्टी ऑल नाइट’ हे गाणे बॉलिवूडमधील सर्वात महागड्या गाण्यांपैकी एक आहे. हे गाणे बँकॉकमधील एका क्लबमध्ये ६०० परदेशी मॉडेल्ससह शूट करण्यात आले होते. त्याचवेळी लोकप्रिय गायक हनी सिंगने (Honey Singh) या गाण्याला आपला आवाज दिला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या गाण्यासाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

राम चाहे लीला
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘राम लीला’ या गाण्यात प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) दिसली होती. या गाण्यातील प्रियांकाची स्टाइल आणि डान्स प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्याचवेळी ते बनवण्यासाठी तब्बल ६ कोटी रुपये खर्च आला.

किलीमांजारो
या यादीत रजनीकांत यांच्या ‘रोबोट’ चित्रपटाचेही नाव आहे. हा ‘२.०’ चा पहिला भाग होता. या चित्रपटातही ते रोबोटच्या भूमिकेत दिसले होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) दिसली होती. वृत्तानुसार, चित्रपटातील ‘किलीमांजारो’ गाणे बनवण्यासाठी ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

छम्मक छल्लो
शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या ‘रा.वन’ चित्रपटातील ‘छम्मक छल्लो’ हे गाणे बनवण्यासाठीही करोडो रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटात शाहरुख खान सुपरहिरोच्या अवतारात दिसला होता. या गाण्यासाठी हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक एकोनला भारतात बोलावण्यात आले होते. रिपोर्ट्सनुसार, ते बनवण्यासाठी ३ कोटी रुपये लागले.

तू मेरी मैं तेरा
अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांच्या ‘नमस्ते इंग्लंड’ चित्रपटातील ‘तू मेरी मैं तेरा’ गाणे बनवण्यासाठीही करोडो रुपये खर्च करण्यात आले होते.

हे गाणे जवळपास १८ ते २० लोकेशन्सवर शूट करण्यात आले असून, यासाठी तब्बल ५.५ कोटी रुपये खर्च आला आहे. त्याच वेळी, गाणे शूट करण्यासाठी ११ दिवस लागले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा