Saturday, June 29, 2024

माय- लेकाने पंजाबी गाण्यावर केला धमाकेदार डान्स, सोशल मीडियावर होतोय व्हायरल; एकदा पाहाच

सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टी व्हायरल होत असतात. यामध्ये विवादित, तर अनेक वेळा नकारात्मक गोष्टी देखील व्हायरल होत असतात. काही गोष्टी प्रेक्षकांना सुखद अनुभव देतात, तर काही गोष्टींमधून अनेकांना शिकवण मिळते. खरं तर सोशल मीडिया हे आपले जगाशी ओळखू करून देणारे माध्यम आहे. या कोरोना काळात सगळेच सोशल मीडियावर मजेशीर गोष्टी शेअर करण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून सगळ्यांचे मूड चांगले राहतील. अशातच सोशल मीडियावर एक माय- लेकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रेम आणि मनोरंजनाचे मिश्रण असलेल्या या व्हिडिओमध्ये मायलेक पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

ट्विटर युजर अपर्णा हिने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कमी वयाचा एक मुलगा आणि एक महिला पंजाबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, या व्हिडिओमध्ये डान्स करणारा मुलगा आणि ती स्त्री आई आणि मुलगा आहे. आई आणि मुलाच्या या जुगलबंदीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. त्यांच्या या व्हिडिओचे खूप कौतुक होत आहे.

एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “कोरोना काळात असे सकारात्मक व्हिडिओ पाहिल्याने मनोबल वाढते.” या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, त्या आई आणि मुलाने कुर्ता घातला आहे आणि ते ‘रौनक होजू घाट वे चल मेले नू चलिये’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे.

हे दोघे ज्या गाण्यावर डान्स करत आहे ते गाणे 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘अंग्रेज’ या पंजाबी चित्रपटातील आहे. हे गाणे या चित्रपटातील सुपरहिट गाणे आहे. या गाण्याचे संगीत खूप सॉफ्ट आहे. त्यामुळे प्रेक्षकांना हे गाणे खूप आवडते. हे गाणे पंजाबमधील लोकप्रिय गायक ‘अमरिंदर गील’ यांनी गायले आहे. ‘अंग्रेज’ या चित्रपटात टीव्हीवरील ‘गंगा’ या मालिकेत मुख्य भूमिका निभावणारी अभिनेत्री अदिती शर्मा देखील दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

-‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, ‘खड तैनू मैं दस्सा’ गाण्यावरील नेहा कक्करचे एक्सप्रेशन्स पाहून युजरची कमेंट

-तूफानों से’ गाणं म्हणत कैलाश खेर, शिबानी कश्यप अन् सुदेश भोसले यांनी केला कोरोना योद्धांना सलाम

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा