Saturday, October 18, 2025
Home बॉलीवूड मौनी रॉयच्या ‘या’ चुकीमुळे उडाला अंबानींच्या घरात गोंधळ, सायरणच्या आवाजाने चक्रावली होती अभिनेत्रीही

मौनी रॉयच्या ‘या’ चुकीमुळे उडाला अंबानींच्या घरात गोंधळ, सायरणच्या आवाजाने चक्रावली होती अभिनेत्रीही

देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीच्या दिमाखदार लग्न सोहळ्याची प्रचंड चर्चा झाली होती. या सोहळ्यासाठी बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात नृत्य सादर करण्यासाठी आलेल्या मौनी रॉय च्या एका चुकीमुळे अंबानींच्या घरातील सायरण वाजायला लागला होता, ज्यामुळे सुरक्षारक्षक आणि मौनी रॉयमध्ये बराच वादही झाला होता.

काय आहे नेमकं प्रकरण?
आकाश अंबानीच्या लग्न सोहळ्यात अनेक कलाकारांना कार्यक्रम सादर करण्यासाठी आमंत्रित केलं होतं. यामध्ये मौनी रॉय देखील परफॉर्म करणार होती. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुंदर ड्रेस आणि वेषभूषा करून आलेली मौनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. दरम्यान कार्यक्रमात प्रवेश करताना तिथल्या सुरक्षा रक्षकांनी तिला अडवले आणि सुरक्षेच्या कारणास्तव सगळ्यांच्या मोबाईलचे कॅमेरे सील करण्यात आले आहेत, असं सांगितलं गेलं. त्यावेळी मौनी रॉयच्या मोबाईलचा सुद्धा कॅमेरा सील करण्यात आला.

https://www.instagram.com/p/CUT-DCwqjVw/?utm_source=ig_web_copy_link

यानंतर परफॉर्मेंसची तयारी करण्यासाठी रूममध्ये गेलेल्या मौनी रॉयने बसल्या बसल्या तिच्या मोबाईलचा सील केलेला कॅमेरा मोकळा केला, ज्यामुळे मोठमोठ्याने सायरण वाजायला लागला. या सगळ्या प्रकारामुळे मौनी सुद्धा चक्रावून गेली होती. या आवाजामुळे धावत आलेल्या सुरक्षा रक्षकांनी मोबाईलचा कॅमेरा सील काढल्यामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं. तसंच कॅमेरा पुन्हा सील करण्याची सूचना दिली. या सर्व प्रकारामुळे संतापलेल्या मौनी रॉय आणि सुरक्षा रक्षकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. मौनीने तर कार्यक्रम सादर न करण्याची धमकीच त्यांना दिली होती.

असं सांगण्यात येतं की, मोबाईलचा कॅमेरा सील करण्यासाठी मौनी तयार नव्हती. तिने बर्‍याचवेळा ते सील काढण्याचा प्रयत्नही केला होता. ज्यामुळे तिला कॅमेरा सील न काढण्यासाठी बजावण्यात आलं होतं.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राज कपूर यांनी ‘कुरूप’ मुलगी म्हणून केला होता लता मंगेशकरांचा उल्लेख; पुढे विनंती करूनही ‘गानकोकिळे’ने…

-कॅटरिना ते प्रियंकापर्यंत ‘या’ अभिनेत्री होत्या चॉकलेट बॉयच्या प्रेमात; तर ऐश्वर्याची केली होती अभिनेत्याने फसवणूक

-विक्की कौशलच्या ‘सरदार उधम’ चित्रपटाचा टीझर रिलीझ, पाहायला मिळाला अभिनेत्याचा जबरदस्त लूक

हे देखील वाचा