Thursday, January 15, 2026
Home अन्य मौनी रॉयने पोस्ट करून सांगितले गीतेचे महत्त्व, ‘या’ गोष्टींमुळे माणसं होतात पुढच्या जन्मात डुक्कर आणि साप

मौनी रॉयने पोस्ट करून सांगितले गीतेचे महत्त्व, ‘या’ गोष्टींमुळे माणसं होतात पुढच्या जन्मात डुक्कर आणि साप

आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर जिने अनेकांची मने जिंकून घेतली आहे, अशी मौनी रॉय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे वेगवेगळे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना गीतेचे ज्ञान दिले आहे. तिने इंस्टाग्रामवर श्रीमद् भागवत गीतेचे एक पान शेअर केले आहे. यातून तिने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे की, माणूस पुढच्या जन्मात डुक्कर आणि साप बनतात.

तिने लिहिले आहे की, “अध्याय ८ (भक्ती योग) मध्ये प्रेम आणि त्यागाबाबत सांगितले आहे. अध्याय ८.६ आणि ८.५ हा हृदयाच्या अगदी जवळचा आहे. ज्यामध्ये सांगितले आहे की, आपण मृत्यूच्या वेळी जो विचार करतो तसेच आपण पुढच्या जन्मात होतो. जर आपण मरताना जेवणाचा विचार केला, तर आपण पुढच्या जन्मी डुक्कर बनतो. जर आपण पैशाबाबत विचार केला, तर आपण साप होतो.” (Mouni Roy gave gita knowledge to her fans told when human rebirth as pigs and snakes)

तिने पुढे लिहिले की, “अजामिलच्या कहाणीशिवाय देखील इतर अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे संपूर्ण आयुष्य भक्ती आणि प्रेमाच्या मार्गावर घालावा. जेणेकरून अध्यात्म आपल्या मनात, मेंदूत आणि आत्मात राहील. जर आपण देवाची साथ मिळवू शकलो नाही, तर आपण आयुष्यात काहीच सार मिळवले नाही.”

तिने तिच्या चाहत्यांना हे देखील सांगितले की, शक्य झाल्यास गीतेतील ती पाने नक्की वाचा. तिने हे सांगितले की, “माझ्या समजण्यात काही चूक झाली असेल, तर मला माफ करा. मी केवळ तेच शेअर केले जे मी ऐकले आणि शिकले.”

मौनी रॉयच्या या पोस्टला एक लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहे. तसेच एक हजारांपेक्षाही जास्त कमेंट्स मिळाल्या आहेत. तिच्या या पोस्टवर तिचे अनेक चाहते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

मौनी रॉय तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिने नुकतेच साडीमधील तिचा एक फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोवर दीड लाखापेक्षाही जास्त लाईक्स आल्या आहेत. मौनी ही टेलिव्हिजनवर ‘नागिन’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शहनाझ गिलचा चेहरा पाहून चाहत्यांना जाणवली उदासीनता, व्हिडिओ पाहून करतायत विचारपूस

-‘मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवते’, म्हणत सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल बोलली कियारा\

-जॅकलिन फर्नांडिसचे ब्लॅक ब्रालेट, शिमरी जॅकेटमधील बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हे देखील वाचा