बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिने अलीकडेच बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत लग्न केले, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. अशातच आता मौनी रॉयचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या पतीला नव्हे, तर इतर कोणाला तरी किस करताना दिसत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झाला व्हिडिओ
खरं तर, मौनी रॉयचा हा व्हिडिओ तिच्या लग्नानंतरच्या घरातील प्रवेशाचा आहे. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत अभिनेता अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani) दिसत आहे. मौनी आणि अर्जुन खूप चांगले मित्र आहेत. अर्जुनने मौनी आणि सूरजच्या लग्नाला हजेरी लावली होती आणि लग्नसोहळ्यात जोरदार डान्सही केला होता. (mouni roy kisses arjun bijlani after wedding with suraj nambiar)
कमेऱ्यासमोरच केलं किस
व्हिडिओमध्ये मौनी रॉय अर्जुन बिजलानीला मिठी मारताना दिसत आहे. यानंतर ती त्याच्या गालावर किस करते. अर्जुन म्हणतो, “हा फक्त एक व्हिडिओ आहे, वाईट वाटून घेऊ नका. आज गृहप्रवेशही झाला आहे.” यावर मौनी म्हणते की, “अर्जुन माझा चांगला मित्र आहे.” यानंतर अर्जुनही मौनीच्या गालावर किस करतो. हा व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे.
लग्नानंतर ‘या’ लूकमध्ये दिसली मौनी रॉय
लग्नानंतर मौनी रॉय पहिल्यांदाच पती सूरजसोबत मुंबई विमानतळावर दिसली. या खास प्रसंगी मौनी रॉयने लाल रंगाची साडी परिधान केली होती. कानात मोठे झुमके, हाताला मेहंदी आणि भांगेत असलेला सिंदूर तिच्या लुकमध्ये भर घालत होता. त्याचवेळी सूरजने पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजामा घातला होता. मौनी रॉयने बंगाली आणि दक्षिण भारतीय अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले आहे. या शाही लग्नाला कुटुंबीय आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.
कोण आहे मौनी रॉयचा पती सूरज नांबियार
मौनी रॉय हा इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे, तर सूरज हा या सर्वांपासून दूर असलेला इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. सूरजचा जन्म ६ ऑगस्ट रोजी कर्नाटकातील बंगळुरू येथील एका जैन कुटुंबात झाला. त्याचे प्रारंभिक शालेय शिक्षण जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूलमधून झाले. त्यानंतर २००८ मध्ये त्याने बंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग केले. बिझनेसमॅन असण्यासोबतच सूरज दुबईस्थित इन्व्हेस्टमेंट बँकर देखील आहे. त्याला एक भाऊ आहे ज्याच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये सूरज सह-संस्थापक आहे. ही कंपनी पुण्यात आहे.
हेही वाचा :