Sunday, June 8, 2025
Home अन्य अभिनेत्री मौनी रॉयनं केलं बोल्ड फोटोशूट! हॉट फोटोंवर होतोय कमेंट लाईक्सचा पाऊस

अभिनेत्री मौनी रॉयनं केलं बोल्ड फोटोशूट! हॉट फोटोंवर होतोय कमेंट लाईक्सचा पाऊस

मालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री तसेच गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय असलेली अभिनेत्री मौनी रॉय हिला कोण ओळखत नाही. मालिका क्षेत्रात तिच्या इतकी सुंदर दुसरी कोणतीही अभिनेत्री नसावी इतकं तीच सौंदर्य खुलून दिसतं. याच मोनी रॉयला आपल्या चाहत्यांना जोडून कसं ठेवायचं हे तिला चांगलंच ठाऊक आहे. मौनी ही जितकी सुंदर आहे तितकीच तिच्या हॉटनेसची देखील चर्चा आहे. मध्ये मध्ये मौनी स्वतःचे काही बोल्ड अवतारातील फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. जे व्हायरल व्हायला काडीमात्रदेखील वेळ लागत नाही. आता सुद्धा मौनीनं एक फोटोशूट केलं आहे. हे फोटोज सुद्धा मौनीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. अजूनही आपण जर पाहिले नसतील चला तर मग मोनीचे हे फोटोज पाहुयात.

मौनीने एका पाणवठ्याच्या परिसरात हे फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये मौनीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्यावर तिने दिलेले अप्रतिम एक्सप्रेशन्स यामुळे तिच्या फोटोजना बोल्डनेसचा एक वेगळाच तडका बसला आहे. त्यातील या पहिल्या फोटोचा आपण आनंद घ्या. हळू हळू उर्वरित फोटो देखील पाहुयात.

मौनी रॉय ही गेल्या तेरा चौदा वर्षांपासून मालिका क्षेत्रात काम करत आहे. आज मोनी रॉय हे टीव्ही मालिका क्षेत्रातील एक मोठं नाव झालं आहे. २००६ मध्ये क्यूँ की सास भी कभी बहु थी या सुप्रसिद्ध मालिकेतून तिने आपल्या करियरला सुरुवात केली. या मालिकेत ती सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारत होती. पण हीच मोनी हळू हळू मुख्य भूमिका साकारायला लागली. आणि आता तर जणू ती मालिका क्षेत्रातील एखादी राणीच आहे. असा तिचा थाट असतो. या सोबतच तिचा हा दुसरा हॉट फोटो आपण पहा.

२०१८ मध्ये आलेल्या गोल्ड या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अक्षय कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. २०१९ मध्ये तिचे रोमिओ अकबर वॉल्टर आणि मेड इन चायना हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. २०२० च्या बाबतीत तर काही बोलायलाच नको. तरी सुद्धा गेल्यावर्षी झी५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तिचा लंडन कॉन्फिडेनशीअलहा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता मौनी आपल्याला ब्रम्हास्त्र या मल्टीस्टारर चित्रपटात दिसणार आहे.

आता आपण मोनीचा या फोटोशूट मधील अखेरचा फोटो पहा. या फोटोमधील तिचे एक्सप्रेशन्स अनेकांना घायाळ करतील यात काहीच शंका नाही.

हे देखील वाचा