आजकाल प्रत्येकजण मौनी रॉयच्या सौंदर्यावर फिदा आहे. ती सोशल मीडियावर नेहमी तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिचे फॉलोव्हर्स दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामागील कारण म्हणजे तिचे बोल्ड फोटो. मौनी रॉय आजकाल तिच्या बोल्ड फोटोंमुळे चांगलीच चर्चेत असते. मात्र आता ती चर्चेत येण्याच कारण काहीतरी वेगळंच आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मौनीच्या लग्नाच्या बातम्या समोर येत आहेत. असे म्हटले जात आहे की, ती दुबईतील उद्योजक सूरज नांबियारसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. शिवाय ती त्याच्याशी लग्नही करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये हे कपल अनेक वेळा एकत्र स्पॉट झाले आहे. (mouni roy to marry boyfriend sooraj nambiar in january actress cousin revealed)

जानेवारीमध्ये बांधणार रेशीमगाठ?
नुकत्याच आलेल्या एका ताज्या अहवालानुसार, हे जोडपे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार मौनीचा चुलत भाऊ विद्युत रॉयसरकरने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, मौनी आणि सूरज जानेवारी २०२२ मध्ये लग्न करणार आहेत. लग्नाचे सर्व सोहळे दुबई किंवा इटलीमध्ये होणार आहेत. तो म्हणाला की, त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन बिहारमध्येही दिले जाईल.
गोव्यात साजरा केला वाढदिवस
काही दिवसांपूर्वी मौनीने गोव्यात तिचा वाढदिवस काही जवळच्या मित्रांसोबत साजरा केला. या दरम्यान तिने सोशल मीडियावर तिचे बिकिनी फोटो देखील शेअर केले, जे खूप व्हायरल झाले. शिवाय, अलीकडेच ती ‘दिल गलती कर बैठा है’ या म्युझिक व्हिडिओमध्ये गायक जुबिन नौटियालसोबत रोमान्स करताना दिसली आहे.
अभिनेत्रीचा आगामी चित्रपट
मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन आणि नागार्जुन देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद










