एकता कपूरचा शो ‘नागिन’, यातून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री, मौनी रॉय ही लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामध्ये आपल्याला दिेसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून मौनी एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे दिसून येत आहे.
नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे डान्सचे वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत. मौनीने चाहत्यांना “गुड मॅार्निंग” म्हणत तिचे हे फोटो शेअर केले. मौनीचे हे फोटो पाहुन चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. काही तासांमध्येच फोटोला एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.
View this post on Instagram
तिच्या एका फोटोमध्ये प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आणि निर्माते, रेमो डी सूझाही दिसत आहे. ब्रह्मास्त्रमध्ये नकारात्मक भूमिकेत मौनी; आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसेल.
(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)