Monday, July 1, 2024

रोमियो-ज्युलिएटमध्ये, दिग्दर्शकाने फसवणूक करून मिळवले नग्न दृश्य, कलाकारांनी गुन्हा दाखल करत केली करोडोंची मागणी

सण 1968 मध्ये ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ हा चित्रपट आला तेव्हा लिओनार्ड व्हाईटिंग आणि ऑलिव्हिया हसी किशोरवयीन होते. या चित्रपटाला जगभरातून वाहवा मिळाली. यासाेबतच या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कारही मिळाला. सुप्रसिद्ध इंग्रजी कादंबरीवर आधारित चित्रपटात मुख्य पात्रे साकारणाऱ्या दोन्ही बाल कलाकारांच्या अभिनयाचेही कौतुक झाले. मात्र, सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणावरून आणि त्यातील काही दृश्यांवरून वाद निर्माण झाला आहे. हे दोन्ही कलाकार आता वृद्ध झाले आहेत, पण त्याने ‘रोमियो अँड ज्युलिएट’ चित्रपटाची निर्माती पॅरामाउंट पिक्चर्सवर बाल लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, ‘रोमियो अँड ज्युलिएट’चे दोन्ही बालकलाकार आज आयुष्याच्या सातव्या दशकात पोहोचले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँको झेफिरिली यांनी नग्न दृश्ये करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप दोन्ही कलाकारांनी केला आहे यासाेबतच त्यांनी असा सीन शूट करण्याचा प्रस्ताव यापूर्वी देण्यात आला नसल्याचे सांगितले. याप्रकरणी दोन्ही कलाकारांनी चित्रपटाचा निर्माता पॅरामाउंट पिक्चर्स आणि दिग्दर्शक फ्रँको जाफरिली यांच्यावर दावा ठोकला आहे. तसेच $500 दशलक्ष नुकसानीची मागणी केली आहे. पॅरामाउंट पिक्चर्सने या प्रकरणी अद्याप कोणतेही उत्तर दिलेले नाही.

54 वर्षांनंतर वादात सापडलेल्या ‘रोमिओ अँड ज्युलिएट’ चित्रपटातील दोन्ही कलाकारांचे म्हणणे आहे की, अशा दृश्याबद्दल त्यांना अगोदर माहिती देण्यात आली नव्हती. माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपटाचे दिग्दर्शक जेफ्री यांनी या दृश्याच्या चित्रीकरणापूर्वी सांगितले होते की, त्यांना त्वचेच्या रंगाचे अंडरवियर घालायला लावले जाईल, पण ज्या दिवशी हा सीन शूट झाला त्यादिवशी फक्त बॉडी-मेकअप असेल असं दिग्दर्शकाने सांगितलं. नग्न दृश्ये दिसणार नाहीत अशा पद्धतीने कॅमेरा लावला जाईल असं सांगितलं. या दोन्ही कलाकारांचा आरोप आहे की, जेव्हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अंतिम प्रिंट आली तेव्हा त्यात दोन्ही बाल कलाकारांचे नग्न दृश्य होते. यावर दोघांनी आक्षेप घेतला असता, हा सीन नसेल तर चित्रपट फ्लॉप होईल, असे सांगण्यात आले.

‘रोमिओ अँड ज्युलिएट’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे हे दोन्ही कलाकार आज आयुष्याच्या सातव्या दशकात पोहोचले आहेत. रोमियोची भूमिका करणारा लिओनार्ड व्हाईटिंग तेव्हा 16 वर्षांचा होता तर आता 72 वर्षांचा आहे. त्याच वेळी, ज्युलिएटची भूमिका करणारी ऑलिव्हिया हसी 1968 मध्ये 15 वर्षांची होती तर ती आता 71 वर्षांची आहे. (movie romeo juliet undressed scene olivia hussey leonard whiting sue paramount pictures claim 50 crore dollor)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘दाखवणे बंद करा लोक बोलणे बंद करतील’, उर्फी जावेद व चित्रा वाघ यांच्या वादावर सुप्रिया सुळे यांचे मत

‘आता हा गंध मनात ठेवून…’, सुव्रत जोशीच्या कलाकृतीची निवृत्ती, पोस्ट शेअर करत दिली माहिती

हे देखील वाचा