कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र दैना उडाली होती. चित्रपटसृष्टीवरही मोठा परिणाम झाला होता. जवळपास ७ ते ८ महिने चित्रपटगृहे बंद होती. अशातच सिनेचाहत्यांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने येत्या २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स सुरू करण्याची घोषणा आधीच केली होती. मात्र, तेव्हा याबाबतची एसओपी (SOP) जारी केली नव्हती. त्यामुळेच मागील काही महिन्यांपासून चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यपारी वर्गात चिंता होती. कारण, एसओपीशिवाय चित्रपटगृह सुरू केली जाऊ शकत नव्हती. अशातच ११ ऑक्टोबर रोजी ही प्रतीक्षा संपली आणि महाराष्ट्र शासनाने एसओपी जारी केली.
आता अनेकांना एसओपी म्हणजे काय?, असा प्रश्न पडला असेल. एसओपीचा फुल फॉर्म हा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असा आहे. म्हणजेच प्रशासनाची मानक संचालन प्रक्रिया होय. महाराष्ट्रात चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स उघडण्यासाठी ज्या मागण्या केल्या आहेत, त्यामध्ये चित्रपटगृहात सोशल डिस्टन्सिंगची संपूर्ण काळजी घेतली गेली पाहिजे. तसेच तोंडावर मास्क असला पाहिजे आणि चित्रपटगृहात सॅनिटायझरचाही वापर झाला पाहिजे. यासोबतच अनेक नियमही आहेत. (Movie Theatres And Multiplexes Will Reopen In Maharashtra From October 22 The Govt Has Issued SOP)
दाखवावे लागेल व्हॅक्सिनेशनचे सर्टिफिकेट
तुम्हाला चित्रपटगृहात चित्रपट पाहायचा असेल आणि तुमचे व्हॅक्सिनेशन झाले असेल, तर तुम्हाला चित्रपटगृहात जाण्यापूर्वी तुम्हाला व्हॅक्सिनेशनचे सर्टिफिकेट दाखवावे लागेल. तरीही, ज्यांचे आतापर्यंत व्हॅक्सिनेशन झालेले नाही, तेदेखील चित्रपटगृहात जाऊ शकतात. मात्र, त्यांनी आरोग्य सेतू ऍपवर स्वत:ला सुरक्षित असल्याचे दाखवावे लागेल. प्रेक्षक चित्रपटगृहात जाण्यापूर्वी चित्रपटगृहातील कर्मचारी त्यांचे तामपानही तपासतील.
पन्नास टक्के उपस्थितीत देण्यात आली परवानगी
सध्या ५० टक्के उपस्थितीसह चित्रपटगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जेणेकरून चित्रपटगृहात जास्तीत जास्त गर्दी होणार नाही. यासह, शोच्या वेळेवर काम करण्यास सांगितले आहे. एसओपीमध्ये असेही म्हटले आहे की, प्रेक्षकांनी ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य द्यावे. सर्व चित्रपटगृहाना प्रत्येक शोनंतर संपूर्ण सभागृह पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासह, तेच कर्मचारी थिएटरमध्ये काम करू शकतील, ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत.
खाण्यापिण्याच्या वस्तूंना नसेल परवानगी
एकीकडे जिथे प्रेक्षकांसाठी चित्रपटगृहे सुरू करण्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे निराशेची बातमीही आहे. खरं तर, ज्या प्रेक्षकांना चित्रपट पाहताना शीतपेय, पॉपकॉर्न किंवा काही खाण्याची सवय आहे, त्यांना याची परवानगी चित्रपटगृहात नसेल. प्रशासनाने जारी केलेल्या एसओपीमध्ये हे सांगण्यात आले आहे की, चित्रपटगृहात पॉपकॉर्न, शीतपेय किंवा कोणत्याही खाण्यापिण्याच्या गोष्टींना परवानगी दिली जाणार नाही.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मायशा- ईशानच्या नात्याबद्दल उमरने केली ‘अशी’ कमेंट, सोशल मीडियावर चाहते बांधतायेत कौतुकाचे पूल
-कर्जात बुडालेल्या अमिताभ बच्चन यांचे तारणहार ठरले ‘यश चोप्रा’ आणि ‘केबीसी’
-सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर, कायमची मुंबई सोडणार शेहनाझ गिल? चाहते पडले चिंतेत










