Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड पडद्यावर येण्यापूर्वीच चर्चेत ‘हीट’ ठरले हे चित्रपट; दांडगा विरोध आणि टीकेनंतरही गाजवलं बॉक्स ऑफिस

पडद्यावर येण्यापूर्वीच चर्चेत ‘हीट’ ठरले हे चित्रपट; दांडगा विरोध आणि टीकेनंतरही गाजवलं बॉक्स ऑफिस

 

आपल्या देशात चित्रपट आणि कलाकार यांवर लोकांचे खूप प्रेम आहे आणि यांना लोक फॉलो सुद्धा करतात. आताच्या काही काळात चित्रपट हा खूप नाजूक आणि संवेदनशील विषय बनला आहे. त्यातही जर तो ऐतिहासिक, धार्मिक असेल तर मग अधिकच कठीण झाले आहे.

चित्रपटांवरून समाजात आणि आपल्या पुढच्या पिढीला चुकीचा संदेश जाईल त्यांमुळे अनेक सिनेमांना विरोध केला जातो. कधी हा विरोध चित्रपटाच्या कथेमुळे होतो तर कधी कलाकारांच्या चुकीच्या विधानांमुळे.

अजून चित्रीकरणाला सुद्धा सुरुवात झाली नाही तरी ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘रावण खलनायक नव्हता’ या सैफ अली खानच्या वक्तवाक्यामुळे ‘आदिपुरुष’ वादात अडकला असून आता ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.

यापूर्वी देखील अनेक चित्रपटांना वेगवेगळ्या कारणांवरून वादाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्याचा परिणाम झाला होता. पाहूया अशाच काही चित्रपटाची नावे.

लक्ष्मी :

साऊथचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कांचना’ या सिनेमाचा हिंदी रिमेक म्हणजे लक्ष्मी. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला ‘लक्ष्मी’ हा सिनेमा काही दिवसांपूर्वी हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या सिनेमाचा ट्रेलर पाहून सिनेमातील प्रेमकथेला लोकांनी ‘लव्ह जिहाद’ सोबत जोड़ण्यास सुरुवात केली. मुस्लिम मुलगा आणि हिंदू मुलगी यांची प्रेमकथा यात आहे. त्याचमुळे लव्ह जिहाद अंतर्गत या चित्रपटावर अनेक टीका झाला. शिवाय ‘लक्ष्मी बॉम्ब’ असे सिनेमाचे नाव असल्याने लक्ष्मी हे देवीचे नाव असून लक्ष्मी नावापुढे बॉम्ब हा शब्द लावल्याने. मुकेश खन्नासोबत अनेक कलाकार आणि राजकारणी लोकांनी या नावाला कडाडून विरोध केला. त्याचमुळे या सिनेमाचे नाव फक्त ‘लक्ष्मी’ असे ठेवण्यात आले. अनेक अडचणींनंतर हा सिनेमा ९ नोव्हेंबरला हॉटस्टारवर प्रदर्शित झाला.

पद्मावत:

दीपिका पदुकोण, शाहिद कपूर, रणवीरसिंग यांची मुख्य भूमिका असणारा ‘पद्मावत’ हा सिनेमा आतापर्यंतच्या सर्वाधिक विवादित चित्रपटांपैकी एक आहे. महाराणी पद्मावतीवर आधारित या सिनेमाची कथा असून, राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती. ‘पद्मावत’ हा सिनेमा सुरुवातीपासूनच वादात अडकला होता. करणी सेनेने या सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी आणत, चित्रपट महाराणी पद्मावतीचा इतिहास चुकीचा दाखवल्याचा आरोप केला होता. शिवाय या सिनेमामुळे संजय भन्साळी, दीपिका पदुकोण यांना जिवेमारण्याच्या धमक्या देखील आलाय होत्या. १ डिसेंबरला प्रदर्शित होणारा हा सिनेमा प्रदर्शितच झाला नाही. अनेक बदल करून,सीन्स काढून सरतेशेवटी २५ जानेवारी २०१८ला प्रदर्शित झाला.

 

उडता पंजाब:

शाहिद कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, दलजित डोझाज यांची मुख्य भूमिका असलेला ‘उडता पंजाब हा सिनेमा सुद्धा मोठ्या वादाला समोर गेला आहे. सिनेमाच्या नावात पंजाब राज्याचा उलेख्ख आल्याने खूप मोठा निर्माण झाला होता. पंजाब मधील अनेक राजकारण्यांनी या नावावरून आणि कथेवरून चित्रपटाला जोरदार विरोध केला होता. सिनेमाचे नाव आणि कथा यांमुळे पंजाबची प्रतिमा मालिन होईल असे राजकारण्याचें म्हणणे होते. शिवाय ड्रग्स घेणारा गायक, निवडणुकांच्या वेळी वाटली जाणारी ड्रग्सची पाकिटे आदी दृशांमुळे या सिनेमाला मोठा वाद शान करावा लागला. या सिनेमातून पंजाब राज्यातील तरुणांमध्ये वाढणाऱ्या ड्रग्सच्या सेवनाचे विदारक वास्तव मांडण्यात आले होते.

मणिकर्णिका :

वाद आणि कंगना हे समीकरण प्रेक्षकांसाठी नवीन नाही. नेहमी विवादित विधानांमुळे चर्चेत असणाऱ्या कंगना राणावतचे चित्रपट देखील वादात अडकत असतात. अनेक गोष्टींमुळे हा चित्रपट सारखा वादात अडकत होता. सुरुवातीला चित्रपटासाठी काम करणाऱ्या सेटवर असणाऱ्या लोकांच्या पगारवरून समस्या झाली ती नीट होत नाही तोवर, ब्राह्मण महासंघाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला कडाडून विरोध केला. या सिनेमात राणी लक्ष्मीबाई यांचे आणि एका इंग्रज अधिकारसोबत प्रेमगीत असल्याचा आरोप त्यांनी केला.त्यामुळे समाजात राणी लक्ष्मीबाई यांची ऑप ब्राह्मण संघाने केला. चुकीची प्रतिमा जाईल असा ar हा वाद सुटत नाही तोपर्यंत दिग्दर्शक आणि कंगना यांच्यात श्रेयवादावरून नाराजी झाल्याची बातमी आली.

हैदर :

शाहिद कपूर, श्रद्धा कपूर आणि तब्बू यांची मुख्य भूमिका असणारा हैदर या सिनेमाने सुद्धा अनेक वाद झेलत चित्रपटाचे प्रदर्शन केले.या सिनेमात अशी अनेक सूडजस आहे ज्यमुळे भांडण होऊ शकते. शिवाय या सिनेमातून भारतीय आर्मीची चुकीची बाजू दाखवली असल्याचा आरोप करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी असलेल्या आर्मीला असे चुकीचे नकारात्मक कसे कोण दाखवू शकते असा प्रश्न विचारण्यात येत होता.

माय नेम इज खान :

करण जोहर दिग्दर्शित आणि शाहरुख खान, काजोल अभिनित ‘माय नेम इज खान’ हा अतिशय गाजलेला सिनेमा. मात्र या सिनेमाने सुद्धा अनेक वाद झेलले. शाहरुख खानने ‘आय.पी.एल मध्ये पाकिस्तानी खेळाडूंना देखील खेळण्याची परवानगी मिळावी’ असे विधान केले होते. यावरून शिवसेनेसोबत अनेक पक्ष आणि राजकारण्यांनी तिच्यावर टीका करत, माय नेम इज खान वर बंदी आणण्याची मागणी केली होती.

ऐ दिल है मुश्किल :

करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा पाकिस्तानी कलाकाराने काम केल्यामुळे वादात अडकला होता. उरी हमल्यानंतर काहीच दिवसांनी हा सिनेमा प्रदर्शित होणार होता, मात्र उरी हमल्यानंतर भारत, पाकिस्तान यांचे संबंध खराब झाले. ऐ दिल है मुश्किल या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याने काम केले असल्याने करण जोहर देशविरोधी असल्याचे सांगत सिनेमाला विरोध झाला. राज ठाकरे त्यांच्या मनसेसह अनेक पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला. अख्तर करण जोहरने या पुढे कधीही पाकिस्तानी कलाकारांसोबत कमी करणार नसल्याचे सांगितल्यावर सिनेमा प्रदर्शित झाला.

गोलियों की रासलीला- राम-लीला :

संजय भन्साळी दिग्दर्शित आणि दीपिका, रणवीर अभिनित हा सिनेमादेखील वादांमुळे खूप गाजला. चित्रपटाचे सुरुवातीचे नाव ‘रामलीला’ होते. या नावावरून अनेक आरोप झाले. हिंदूंच्या भावना दुखवल्याचा आरोप देखील झाला. त्यानंतर नाव बदलून राम-लीला ठेवण्यात आले. त्यावरून देखील वाद झाले अखेर या सिनेमाचे पुन्हा नाव बदलून गोलियों की रासलीला- राम-लीला असे करण्यात आले. सोबतच कलाकारांनी क्षत्रिय समाजच्या लोकांच्या चुकीच्या प्रतिमा दाखवल्याचा आरोप केला. म्हणून त्या सिनेमात असलेल्या दोन समाजची नावे बदलून रजाडी आणि सनेणा ठेवण्यात आली.

मद्रास कैफे :

सुजित सरकार यांच्या मद्रास कैफे या सिनेमावर देखील अनेक वाद झाले. जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असलेला ह्या सिनेमाला तामिळनाडूच्या काही तामिळ संघटनांनी विरोध केला होता. राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित हा सिनेमा तामिळनाडूच्या राजकारणाची प्रतिमा मालिन होईल असे वाटत असल्याने या सिनेमाला विरोध झाला.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा