Tuesday, July 23, 2024

आयपीएस टीना दाबी होणार महाराष्ट्राच्या सुनबाई, चर्चेत आले IPS अधिकाऱ्यांवर आधारित ‘हे’ चित्रपट

सध्या देशभरात २०१५च्या युपीएसई परिक्षेत देशात पहिल्या क्रमांकाने पास झालेल्या आईएस अधिकारी टीना दाबी त्यांच्या दुसऱ्या लग्नाच्या बातमीने सर्वत्र चर्चेत आहेत. टीना दाबी यांनी पहिला पती अतहर खानला घटस्फोट दिल्यानंतर, त्यांनी सात महिन्यातच दुसरे लग्न केल्याचा निर्णय घेतला आहे. आता त्या आयएस अधिकारी प्रदीप गवांडे यांच्याशी लग्न करणार असून त्या जळगावच्या सुनबाई होणार आहेत. या विवाह सोहळा २० एप्रिल ला होणार आहे आणि २२ एप्रिलला या लग्नाचा रिसेप्शन सोहळा पार पडणार आहे. तत्पुर्वी आता या बातमीने आजपर्यंत हिंदी चित्रपट जगतात तयार झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनावर तयार करण्यात आलेले चित्रपट पून्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोणते आहेत ते चित्रपट चला जाणून घेऊ. 

शादी में जरुर आना
‘ठुकराके मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी’ म्हणत राजकुमार रावचा ‘शादी में जरुर आना’ चित्रपट चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटाने देशभरातल्या प्रेमवीरांना प्रेमात धोका देणाऱ्या प्रेयसीला कसा धडा शिकवायचा याचे उत्तम मार्गदर्शन केले होते. चित्रपटात राजकुमार राव आणि कृती खरबंदा यांची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. ज्यामध्ये ती लग्नाच्या ऐनवेळी राजकुमार रावला नकार देते. त्यामुळे अपमानित झालेला राजकुमार राव प्रशासकीय अधिकारी होऊन तिला धडा शिकवतो.

शांघाई
हा चित्रपट भ्रष्ट राजकारणी आणि सरकारी अधिकारी यांच्या संगनमताने फिरताना दिसतो. चित्रपटात एक आयएएस अधिकारी (अभय देओल) राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या संगनमताने मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवतो. अशी कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

सरफरोश
आमिर खान, सोनाली बेंद्रे आणि नसीरुद्दीन शाह स्टारर हा चित्रपट एका तरुण आयपीएस अधिकाऱ्याची कथा आहे. सीमेपलीकडून अवैध शस्त्रास्त्र तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्यात तो यशस्वी होतो. या चित्रपटात आमिर खानने एसीपी अजय राठोड यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील आमिरच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते.

गंगाजल
हा चित्रपट बिहारमधील एका जिल्ह्यात तैनात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याच्या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात अजय देवगणने आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बाहेरील समाजकंटकांशी तसेच त्यांच्याच विभागातील भ्रष्ट लोकांशी ते भांडतात असा संघर्ष या चित्रपटात दाखवण्यात आला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा