Wednesday, July 3, 2024

शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे हे आहेत बॉलीवूड मधले काही गाजलेले सिनेमे

यावर्षी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी कृषिबिल पास केले. आता मात्र या कृषीबिलाविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन टीव्ही पासून सोशल मीडिया पर्यंत सर्वच ठिकाणी चर्चेत आहे. त्याच अनुषंगाने आम्ही तुम्हाला आज आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये शेतकऱ्यांवर त्याच्या आयुष्यावर आधारित तयार झालेल्या चित्रपटांबद्दल माहिती देणार आहोत.
आपला शेतकरी आणि त्याचे खडतर जीवन हे तर सर्वांनाच माहित आहे. कदाचित हे माहित असण्याचा मुख्य स्रोत म्हणजे चित्रपट हा देखील असावा. आपल्या अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी शेतकऱ्यांच्या व्यथा चित्रपटातून मांडण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्यात आले. चला तर मग पाहूया अशाच काही चित्रपटांची नावे.

दो बिघा जमीन:
शेतकऱ्यांवर आधारित चित्रपट बनवण्याची सुरवात जवळपास ५३ वर्षांपूर्वी ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटापासून झाली. या चित्रपटात आई समान असणारी शेतकऱ्याची जमीन सावकार कर्जाच्या बदल्यात शेकऱ्यांकडून
हिरावून घेतो. ती जमीन सोडवण्यासाठी कर्जाच्या बोज्याखाली दबलेला शेतकरी आणि सावकारांकडून त्याचे होणारे शोषण याचे उत्तम सादरीकरण या चित्रपटात पाहायला मिळते. बिमल रॉय दिग्दर्शित आणि बलराज सहानी, निरुपमा रॉय अभिनित या सिनेमाला त्या वर्षीचा सर्वोत्तम चित्रपटाचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला.

पिपली लाइव्ह:
आमिर खान प्रोडक्शन अंतर्गत तयार झालेला’ पिपली लाइव्ह’ हा सिनेमा गरिबीशी लढणारा शेतकरी आणि देशातील मीडिया यांच्यावर भाष्य करतो. आजच्या परिस्थितीशी अतिशय समपर्क असा हा सिनेमा आहे.

उपकार: आरक्षित
मनोज कुमार अभिनित हा सिनेमा १९६७ साली प्रदर्शित झाला. शेतकऱ्याची पत्नी पैशाअभावी तिच्या दोन्ही मुलांना जास्त शिकवू शकत नाही, म्हणून ती एकाला पुढील शिक्षणासाठी शहरात पाठवते. काही काळानंतर तिच्या जवळ असलेला मुलगा शेतकरी होतो. शेतकरी मुलाला खूप संघर्ष करून जीवन जगावे लागत असते. लोकांच्या छक्क्या-पंज्यांमध्ये अडकत त्याचा संघर्ष सुरु असतो. याच परिस्थितीचे विदारक चित्रण या सिनेमात पाहायला मिळते.

लगान:
२००१ साली प्रदर्शित झालेला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित आणि आमिर खान अभिनित लगान हा सिनेमा पूर्णतः शेतकऱ्यांवर आधारित नसला तरीही मुख्य विषय जमीन हाच होता. शेतजमीनीवर लावलेला लगान (कर) न देण्याच्या बदल्यात क्रिकेट खेळण्याचे आव्हान शेतकऱ्यांना दिले जाते. हा सिनेमा ऑस्करसाठी देखील पाठवला गेला होता.

मंथन:
श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘मंथन’ हा चित्रपट १९७६ यावर्षी प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारतात झालेल्या श्वेत क्रांतीवर भाष्य करतो. पाच लाख शेतकरी २-२ रुपये जमा करून एका आंदोलनाला क्रांतीचे स्वरूप देतात.या चित्रपटाला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरकर देखील प्राप्त झाला.

मदर इंडिया:
१९५७ साली आलेला मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया’ हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील एक अत्युच्च कलाकृती आहे. एक स्त्री शेती करत असते, तिच्या वाट्याला येणाऱ्या दुःखांना, गरिबीला ती कसे तोंड देते आणि पोट भरण्यासाठी ती कसा संघर्ष करते याचे विदारक चित्रण सिनेमात पहायला मिळते. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

किसान:
२००९ साली आलेल्या या सिनेमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्यामागची भयावह कारणे यावर आधारित हा सिनेमा होता. यात सोहेल खान आणि अरबाज खान यांनी मुख्य भूमिका साकारली होती.

कडवी हवा:
२०१७ ला प्रदर्शित झालेला हा सिनेमा शेतकऱ्यांच्या आजच्या स्थितीवर मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. प्रत्येकवेळी बदलणाऱ्या वातावरणचा, हवामानचा आजच्या शेतकऱ्यांवर कसा आणि किती भयानक परिणाम होतो याचे समर्पक चित्रण या चित्रपटातून प्रेक्षकांना घडते. संजय मिश्रा यांचा जिवंत अभिनय आणि काळजाला भिडणारा विषय यामुळे या सिनेमाला ‘विशेष ज्युरी राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

हे देखील वाचा