Saturday, June 29, 2024

कमाईच्या बाबतीत ‘पुष्पा’ला टक्कर देणारे टॉलिवूड सिनेमे

‘पुष्पा नाम सुनकर फ्लावर समजे क्या, फायर है मैं, पुष्पा… पुष्पाराज मैं झुकेगा नहीं साला…’ जिकडे- तिकडे सर्वांच्या तोंडात ‘पुष्पा: द राईज’ सिनेमातील फक्त हेच डायलॉग ऐकायला मिळतायत. डिसेंबर, २०२१मध्ये रिलीझ झालेल्या या सिनेमात आयकॉन स्टार अल्लू अर्जुनने (allu arjun)आपल्या जबरदस्त अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. फक्त तेलुगूच नाही, तर तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अशा एकूण ५ भाषेत हा सिनेमा प्रदर्शित झालाय. बॉक्स ऑफिसवर तर हा सिनेमा धुमाकूळ घालतोय. पुष्पाने फक्त भारतात २५८ कोटी, तर जगभरात ३४० कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. पण पुष्पालाही कमाईच्या बाबतीत टक्कर देणारे काही टॉलिवूड सिनेमे आहेत. चला जाणून घेऊया असे कोणते टॉलिवूड सिनेमे आहेत, ज्यांनी पुष्पालाही मागे टाकलंय?

‘बाहुबली: २’
२०१७ साली एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या ‘बाहुबली २’ या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. कारण यामध्ये प्रभासचा दमदार अभिनय बघून प्रेक्षक प्रभाससाठी वेडे झाले होते. या सिनेमात अनुष्का शेट्टी, तमन्ना भाटिया या अभिनेत्री मुख्य भूमिकेत होत्या. या सिनेमात कटप्पाने बाहुबलीला का मारलं या सस्पेन्समुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. त्यामुळेच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच गोंधळ उडवला होता. या सिनेमानं भारतात १४२९ कोटी रुपयांची, तर जगभरात १८१० कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘बाहुबली: द बिगिनिंग’
जेव्हा ‘बाहुबली: द बिगिनिंग’ हा सिनेमा थेटरात लागला होता, तेव्हा या सिनेमासाठी चाहत्यांमध्ये भलतीच क्रेझ होती. या सिनेमातील कलाकारांचा तगडा अभिनय प्रेक्षकांना खूपच भावला होता. त्यामुळेच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर भारतात ५८१ कोटी, तर जगभरात ६५० कोटी रुपयांची कमाई केली होती.

‘रोबोट’
‘थलायवा’ रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांचा २०१० मध्ये ‘रोबोट’ सिनेमाही प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या यशानंतर तब्बल ८ वर्षानंतर या सिनेमाचा सिक्वल ‘२.०’ हा सिनेमा २९ नोव्हेंबर, २०१८ रोजी रिलीझ झाला. यावेळी या सिनेमात पहिल्यांदाच रजनीकांत आणि सुपरस्टार अक्षय कुमारने स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे, या सिनेमातून पुन्हा एकदा रजनीकांत यांनी बॉक्स ऑफिसवर आपण सुपरहिट असल्याचं दाखवून दिलं. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर भारतात तब्बल ५१९ कोटी, तर जगभरात ६५५ कोटींची कमाई केली होती.

साहो
प्रभास, श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मुरली शर्मा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या २०१९ सालच्या ‘साहो’ सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर राज्य केलं होतं. कोट्यवधी रुपये खर्चून निर्माते, दिग्दर्शकांनी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी बरेच ऍक्शन सीन या सिनेमात दाखवले. या सिनेमानं भारतात ३०१ कोटी, तर जगभरात ४३३ कोटी रुपयांची कमाई केली होती. अशाप्रकारे हा सिनेमा सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉलिवूड सिनेमांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अभिनेत्री कुब्रा सैतने केले मोठे वक्तव्य; म्हणाली, ‘बॉलिवूडमध्ये राक्षस भरलेले आहेत’

‘कॉफी विथ करण’मधील सेलिब्रेटींना मिळणाऱ्या गिफ्ट हँपरमध्ये असतं तरी काय? घ्या जाणून 

‘नागीण’मधील ‘या’ अभिनेत्रीने ९ वर्षाने लहान असणाऱ्या बॉयफ्रेंडसोबत केले गुपचूप लग्न

हे देखील वाचा