Tuesday, July 9, 2024

आमदाराच्या मुलीला ‘थार’ गाडी मिळावी म्हणून लिहिलेल्या शिफारस पत्रामुळे सनी देओल वादाच्या भोवऱ्यात

बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा गुरदासपूरचा लोकसभा खासदार आहे. तो आपल्या संसदीय मतदारसंघापासून दूर असल्यामुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावेळी सनीने महिंद्रा फोर व्हीलरच्या डीलरला सुजानपूरचे आमदार दिनेश सिंग बब्बूच्या मुलीला लवकरात लवकर ‘थार’ गाडी वितरित करण्यासाठी शिफारस पत्र पाठवले आहे. मात्र, सनी देओलने फेब्रुवारीमध्ये हे पत्र व्यापाऱ्याला पाठवले होते, पण आता हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यामुळे सनी देओल सध्या काँग्रेससह इतर राजकीय पक्षांच्या तावडीत सापडला आहे. 

सनी देओलला सोशल मीडियावर देखील खूप ट्रोल केले जात आहे. त्याच्या चित्रपटांची दृश्ये ‘थार’ आणि आमदार दिनेश बब्बू यांच्याशी जोडून लोक मीम्स बनवत आहेत. त्याच संदर्भात युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस वरुण कोहली म्हणतात की, “जर सनी देओल कंपनीला कार मिळवण्यासाठी पत्र देत आहे, त्याची शिफारस करू शकतात, तर केंद्र सरकारला कृषी कायदे रद्द करण्याची शिफारस करणारे पत्र का पाठवू नये.”

पठाणकोटमधील महिंद्राच्या व्यापाऱ्याला दिलेल्या पत्रात सनी देओलने लिहिले आहे की, आमदार दिनेश सिंग बब्बू यांनी २० जानेवारीला त्यांच्या कुटुंबासाठी काळ्या महिंद्रा थार डिझेल मॉडेलची गाडी बुक केली होती. त्यांनी बुकिंगसाठी २१ हजार रुपयेही दिले आहेत. त्याने लिहिले की, दिनेश सिंग बब्बू हा माझा जवळचा परिचित आहे. त्यांना लवकरच कारची गरज आहे. म्हणून, तो विनंती करतो की, त्याला आपला नंबर येण्यापूर्वीच प्राथमिकतेसह गाडी डिलीव्हर करण्यात यावी. (MP And Actor Sunny Deol Wrote Recommendation Letter To Deliver Thar Vehicle To Sujanpur MLA Dinesh Singh Babbu)

विरोधकांच्या रोषाला सामोरे जाणाऱ्या सनी देओलला भाजपच्या नेत्यांनी सल्ला देणे सुरू केले आहे. माजी कॅबिनेट मंत्री मास्टर मोहन लाल यांनी सनी देओल तसेच आमदार दिनेश बब्बू यांना सल्ला देताना सांगितले की, “जर दिनेश बब्बूने सनी देओलच्या माध्यमातून शिफारस केली तर त्यात काहीच गैर नाही.” ते पुढे म्हणाले की, “पण सनी देओलने हे लक्षात ठेवले पाहिजे की, खासदार हा लोकप्रतिनिधी आहे. त्याने आपल्या कुटुंबाचा, वाहनांचा, सुरक्षित आणि लोकांबद्दल विचार करणे थांबवावे. २४ तास जनतेची सेवा करण्यासाठी खासदार निवडला जातो.”

सनी देओलवर विनोद करत मास्टर म्हणाले की, “सनी देओल बॉलिवूडचा एक मोठा स्टार आहे. पक्षाला लोकसभेची जागा जिंकायची होती. सनी देओलला मजबुरीने तिकीट द्यावे लागले होते. त्याचबरोबर सनी देओलची ही एक मजबुरी होती. म्हणूनच त्याने निवडणूक लढवली आणि जिंकली. पण आता तो लोकसेवक आहे. लोकांची सेवा करणे हे त्याचे पहिले कर्तव्य आहे. लोकांना त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जर त्याने आपली जबाबदारी पार पाडली नाही, तर कोणीही परत त्याला निवडून देणार नाही. जर तो लोकांबरोबर राहिला, तर लोक त्याला आदर आणि सन्मान देतील.”

सनी देओल ‘अपने २’ या चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-माधुरी दीक्षितने परिधान केला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा लेहंगा; किंमत वाचून तुम्हीही म्हणाल, ‘मार डाला’

श्रीदेवींनी अवघ्या ४ वर्षांच्या वयात ठेवले होते फिल्मी दुनियेत पाऊल; बॉलिवूडमध्ये घ्यायच्या अभिनेत्यांपेक्षाही अधिक फी

अपरा मेहतांनी आपल्या अभिनयाने जिंकली चाहत्यांची मने; तर एकाच व्यक्तीशी थाटला होता दोनदा संसार

हे देखील वाचा