Monday, July 1, 2024

‘आमच्या देशाची प्रतिमा मलीन होते’ म्हणत राणी मुखर्जीच्या सिनेमात भारतातील नॉर्वे अँबेसिडर यांनी घेतला आक्षेप

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी राणी मुखर्जी मोठ्या पडद्यावर दिसत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला आधीच प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसाद लाभला होता. नुकताच हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, सिनेमाला आणि राणीच्या अभिनयाला प्रेक्षकांनी, समीक्षकांनी भरपूर दाद दिली आहे. सिनेमाची कथा एका आईवर आधारित असून, एक भारतीय आई आपल्या मुलांना मिळवण्यासाठी विदेशातील अर्थात नॉर्वेतील संपूर्ण प्रशासनाला आणि कायद्याला सामोरे जात लढा देते. हा सिनेमा एका खऱ्या घटनेवर आधारित असून, सिनेमाचे दिग्दर्शन सागरिका भट्टाचार्य यांनी केले आहे. या सिनेमात राणीच्या दमदार अभिनयाने लोकांना आकर्षित केले असून, ती या सिनेमाचे मुख्य आकर्षण ठरली आहे. एकीकडे सिनेमा गाजत असताना दुसरीकडे मात्र आता या सिनेमाला वादाचे बोट लागले आहे.

मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या सिनेमावर आता भारतातील नॉर्वे अँबेसिडर असलेल्या हंस जैकोब फ्रेडुलंद यांनी या सिनेमातील काही सीन्सवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, या सिनेमात त्यांच्या देशाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले असून, यात फेक्चुअल इन एक्यूरेसी सिद्ध आहे. या सिनेमाची स्टोरी एक फिक्शनल रिप्रेजेंटेशन केस आहे. शिवाय सिनेमात नॉर्वेबद्दल असणाऱ्या विश्वासाला आणि वेगवेगळ्या संस्कृतींना चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. मुलं, पालक आणि चाइल्ड वेलफेयर सर्व्हिस यांच्यासाठी हे सोपे नाही. सिनेमात कल्चरल डिफरेंसेस दाखवला गेला असून, हा पूर्णपणे चुकीचा आहे. हाताने जेवण भरवणे आणि एकाच बेडवर मुलांना झोपवणे ऑल्टरनेटिव केयरमध्ये ठेवण्याचे कारण असेल.

हंस पुढे म्हणाले, “चित्रपटात जे काही दाखवले आहे. असे काहीच नाही. नॉर्वेमधील मुलांना देखील त्यांचे आईवडील हाताने जेवण भरवता आणि झोपवताना त्यांना गोष्टी देखील सांगता. माझ्या मुलींसोबत देखील असे केले गेले आहे. जेव्हा मी खोट्या गोष्टींना असे पडद्यावर बघतो तेव्हा ते माझ्यासाठी सहन करणे कठीण होते. मला कल्पना करताना देखील चिंता वाटते की, आमचे भारतीय मित्र मैत्रिणी नॉर्वे वाल्याना किती निर्दयी आणि अत्याचारी समजतील जे नक्कीच आम्ही नाही.”

दरम्यान ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ या सिनेमात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत आहे. जिने एका बंगाली आईची भूमिका साकारली आहे. जी तिच्या मुलांची कस्टडी मिळवण्यासाठी संपूर्ण देशाशी लढते. सिनेमात राणीसोबत नीना गुप्ता, जिम सरभ, अनिर्बान भट्टाचार्य महत्वाच्या भूमिकेत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
…आणि शशी कपूर यांनी पूनम ढिल्लोच्या खाडकन वाजवली कानाखाली, उपस्थित लोकं फक्त पाहतच राहिले
कॉमेडियनच नाही, तर डान्सर म्हणूनही कमवलंय बरंच नाव, जावेद जाफरींबद्दल खास गोष्टी एकाच क्लिकवर

हे देखील वाचा