Tuesday, July 23, 2024

अभिनेत्री मृणाल दुसानीसला कन्यारत्न प्राप्त! सोशल मीडियावर शेअर केले गोड बातमी

मराठी मालिका क्षेत्रातील सुंदर सोज्वळ अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना चांगलाच आनंद झाला आहे. गोड बातमी म्हणजे अभिनेत्री मृणालच्या घरी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. दिनांक २४ मार्चला मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही गोड बातमी तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन दिली आहे. इतकेच नव्हेतर मृणालने या मुलीचे नावही ठेवले आहे. 

याबाबत संपुर्ण माहिती अशी की, लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानिसने फेब्रुवारी महिन्यात प्रेग्नेंट असल्याची बातमी शेअर केली होती. यावेळी तिने लहान मुलांची खेळणी आणि कपड्यांचा फोटो शेअर केला होता. आता २४ मार्चला मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ही बातमी तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर केली आहे. यामध्ये तिने लहान मुलीच्या हातात हात घेतलेला एक क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने “पप्पांची गोड मुलगी आणि आईचं संपुर्ण विश्व” असा गोड कॅप्शन दिला आहे. यासोबतच तिने आत्ताच ‘नुर्वी’ असे या बाळाचे नावही दिले आहे. या बातमीने मृणालला तिचे चाहते आणि मराठी चित्रपट जगतातील कलाकार मंडळींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, अभिनेत्री मृणाल दुसानीस ही मराठी मालिका जगतातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कसदार अभिनय आणि सोबतीला सोज्वळ सौंदर्य लाभलेल्या या प्रतिभावान अभिनेत्रीने मनोरंजन क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. ‘माझिया प्रियाला प्रित कळेना’, ‘तु तिथे मी’  अशा अनेक लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. ती सोशल मीडियावरही सतत सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा