नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक नवनवीन शुभ घोषणा केल्या जात आहे. याच नवीन वर्षात अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या देखील नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. मराठमोळी अभिनेत्री असलेल्या मृणालने बॉलिवूडमध्ये कमालीचे यश मिळवले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत सर्वोत्तम चित्रपटांमध्ये काम करत तिने स्वतःला एक उत्तम अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. बॉलिवूडसोबतच तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आता लवकरच ती अजून एका साऊथ चित्रपटामध्ये दिसणार असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला मृणालच्या या आगामी ‘नानी ३०’ सिनेमाचे नवीन पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा केली आहे. २०२२ या वर्षात मृणाल अनेक चांगल्या कलाकारांसोबत, मोठ्या दिग्दर्शकांसोबत काम करताना दिसली. याशिवाय तिचा ‘सीता राम’ हा साऊथ सिनेमा देखील यावर्षात प्रदर्शित झाला. नुकतीच घोषणा झालेल्या ‘नानी ३०’ या सिनेमाचे दिग्दर्शन नवीन दिग्दर्शक असलेल्या शौर्यव यांनी केले असून या सिनेमाची निर्मिती मोहन चेरुकुरी (सीवीएम), डॉ. विजेंदर रेड्डी तेगला आणि मूर्ति के.एस. यांनी केली आहे.
‘नाणी ३०’ या सिनेमाचे पोस्टर बघता हा सिनेमा एक भावनिक कौटुंबिक चित्रपट दिसत आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक पाहून हा सिनेमा वडील आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा दिसत असून, त्यांच्यात असणाऱ्या नात्याची हळुवार गुंफण या सिनेमातून केली जाणार आहे. अजून या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली नसून फक्त घोषणा केली आहे. आता हा आगामी सिनेमा कधी प्रदर्शित होईल हे लवकरच समजेल.
तत्पूर्वी मृणाल ठाकूर २०२३ साली मोठ्या चित्रपटांमध्ये दिसत आहे. ती लवकरच तामिळ सिनेमा असणाऱ्या ‘थडम’ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये आदित्य रॉय कपूरसोबत दिसणार आहे. या सिनेमात ती एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसेल. टेलिव्हिजनविश्वात काम केल्यानंतर मृणालने बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि यशही मिळवले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
कडक! शिवानी बावकरचे फोटो पाहून लागिर झालं जी
रश्मी देसाईचा हटके लूक! चाहत्यांना पाडतोय भुरळ, पाहा फोटो गॅलरी