Thursday, July 24, 2025
Home बॉलीवूड ‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते’, म्हणत ऋतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

‘मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते’, म्हणत ऋतिक रोशनच्या ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा पती विराट कोहलीचे जगभरात चाहते आहेत. सर्व सामान्य नागरिकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनाच विराट कोहली खूप आवडतो. आता चाहत्यांच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरचे नावही जोडले गेले आहे. मृणाल ठाकूरने ‘सुपर ३०’, ‘बटला हाऊस’ आणि ‘तूफान’ या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. मृणालला विराट खूप आवडतो. तिला क्रिकेट खेळाची प्रचंड आवड आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, मृणालने अलीकडेच तिच्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले आहेत. मृणालने सांगितले की, “तिला लहानपणापासूनच खेळाची खूप आवड आहे. शाळेत खेळांमध्येही ती सहभाग घ्यायची.” एवढेच नाही, तर मृणाल असेही म्हणाली की, एक काळ होता, जेव्हा ती विराट कोहलीवर खूप प्रेम करत होती आणि त्याच्या प्रेमात वेडी झाली होती.

मृणाल म्हणाली की, “मला खेळाची खूप आवड आहे. मी शाळेत असताना चांगले खेळ खेळायचे. मी पहिले बास्केटबॉल खेळायचे, तसेच काही विभागीय खेळातही मी सहभागी होत होते. नंतर मी फुटबॉल खेळायलाही सुरुवात केली. जेव्हा खेळाचा प्रश्न येतो, तेव्हा मी नेहमीच तयार असते. एक काळ होता जेव्हा मी विराट कोहलीच्या प्रेमात वेडी झाले होते. मला माझ्या भावामुळे क्रिकेट आवडायला लागले होते. माझा भाऊ क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे.”

मृणाल लवकरच क्रिकेटपटूवर आधारित ‘जर्सी’ चित्रपटात दिसणार आहे. ती पुढे म्हणाली की, “पाच वर्षांपूर्वी मी माझ्या भावासोबत थेट स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी गेले होते. त्यातील काही क्षण अजूनही माझ्या मनातील आठवणीत तसेच आहेत. मी निळ्या रंगाची ‘जर्सी’ घालून टीम इंडियासाठी जयजयकार केल्याचे आठवते. तर नुकतेच मी क्रिकेटवर आधारित असलेल्या ‘जर्सी’ चित्रपटाचा एक भाग आहे.”

मृणालविषयी बोलायचे झाले, तर तिने तिच्या करिअरची सुरुवात टेलिव्हिजनद्वारे केली होती. तिने बाॅलिवूडमधील ‘बटला हाऊस’ चित्रपटात काम केले. या चित्रपटात ती अभिनेता जॉन अब्राहमसोबत दिसली होती. यानंतर मृणाल ‘सुपर 30’ चित्रपटात ऋतिक रोशनसोबत दिसली. अलीकडेच फरहान अख्तरच्या ‘तुफान’मधील तिच्या कामाचे खूप कौतुक करण्यात आले.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गीता माँ’ने लावली स्टेजवर आग; पाहून शिल्पाही झाली दंग, म्हणाली, ‘हा परफॉर्मन्स पाहिल्यानंतर गीताला…’

-हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिल्यांदा दिसल्या सायरा बानो; हातात होता दिलीप कुमारांचा फोटो

-कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर ‘अशी’ झाली होती रुबीनाची हालत; म्हणाली, ‘मी पुन्हा ५० किलो वजन…’

 

हे देखील वाचा