साल २०१२ मध्ये झी मराठीवर ‘कुंकू’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे होय. यातील ‘जानकी’ हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने ओटीटीवर देखील दमदार एन्ट्री मारली आहे. सिनेसृष्टीत सक्रिय राहणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असल्याचे दिसते. सतत फोटो पोस्ट करून, ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते.
अलीकडेच मृण्मयीने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. हे फोटो अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, मृण्मयीने फिकट हिरव्या रंगाचा सुंदर असा ड्रेस परिधान केला आहे. यासोबतच तिने पांढऱ्या रंगाचं डिझाईनर ब्लाउज घातलं आहे. एकूणच या लूकमध्ये तिची सुंदरता पाहण्यासारखी आहे. शिवाय ती भिंतीच्या जवळ उभी राहून फोटोसाठी पोझ देत आहे. (mrunmayee deshpande looking goegeous in green saree)
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोला पसंती दर्शवली आहे. लाईक आणि कमेंट करून नेटकरी यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. शिवाय फोटोवर आतापर्यंत २४ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. विशेष म्हणजे अनेक कलाकारांनी देखील मृण्मयीच्या या फोटोंवर कमेंट करून, तिचे कौतुक केले आहे.
अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’ या हिंदी चित्रपटाद्वारे मृण्मयीने अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मोकळा श्वास’ मधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अभिनेत्रीने ‘कट्यार काळजात घुसली’, ‘स्लॅमबुक’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे. आता ती ‘सा रे ग म लिटल चॅम्प्स’ या गायन शोला होस्ट करताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कंगना रणौतने शेअर केले बोल्ड लूकमधले फोटो; युजर्स म्हणाले, ‘तू दुसऱ्यांच्या पोस्टवर…’