साल २०१२ मध्ये झी मराठीवर ‘कुंकू’ ही मालिका सुरू झाली होती. या मालिकेद्वारे घरघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजेच मृण्मयी देशपांडे होय. यातील ‘जानकी’ हे पात्र चांगलेच गाजले. केवळ मालिकाच नव्हे, तर नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून मृण्मयीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. याशिवाय काही दिवसांपूर्वीच तिने ओटीटीवर देखील दमदार एन्ट्री मारली आहे. सिनेसृष्टीत सक्रिय राहणारी अभिनेत्री सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय असल्याचे दिसते. सतत फोटो पोस्ट करून, ती चाहत्यांना तिच्याबद्दल अपडेट देत असते.
नुकताच मृण्मयीने एक फोटो पोस्ट केला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मृण्मयीसोबत अभिनेता आदिनाथ कोठारे देखील दिसत आहे. यात अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे, तर अभिनेत्याने निळसर रंगाचा कुर्ता घातला आहे. या फोटोमध्ये दोघेही अप्रतिम दिसत आहेत. शिवाय ते ज्याप्रकारे एकमेकांकडे बघत आहेत, तो अंदाज त्यांच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे. (mrunmayee deshpande shared romantic photo with adinath kothare)
हे फोटो शेअर करत, तिने याला लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. फोटोखाली मृण्मयीने लिहिलंय, “कसं काय पावनं बरं हाय का?” चाहत्यांनी या फोटोला पसंती दर्शवली आहे. लाईक आणि कमेंट करून नेटकरी यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. शिवाय आदिनाथने देखील यावर हार्ट ईमोजी पोस्ट करून त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.
कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर ‘इट्स ब्रेकिंग न्यूज’ या हिंदी चित्रपटाद्वारे मृण्मयीने अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर ‘मोकळा श्वास’ मधील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. अभिनेत्रीने ‘कट्यार काळजात घुसली’, ‘स्लॅमबुक’, ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘शिकारी’ यासह अनेक चित्रपटात काम केले आहे. आता ती ‘सा रे ग म लिटल चॅम्प्स’ हा गायन शोला होस्ट करताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सर्वांना पोट धरून हसवणाऱ्या कपिलने एकेकाळी केलंय टेलिफोन बुथवर काम, वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी
-यामी गौतमचा मोठा खुलासा, किशोरवयीन काळापासून ‘या’ आजाराने आहे अभिनेत्री ग्रस्त