Thursday, October 16, 2025
Home मराठी ‘मला शोभणारा नवरा मिळवा एवढेच शेवटी वाटत होते’, म्हणत मृण्मयी देशपांडेने सांगितली तिची लग्नाआधीची स्टोरी

‘मला शोभणारा नवरा मिळवा एवढेच शेवटी वाटत होते’, म्हणत मृण्मयी देशपांडेने सांगितली तिची लग्नाआधीची स्टोरी

मराठी मनोरंजनविश्वात अशा खूप कमी अभिनेत्री असतील ज्यांनी त्यांच्या अभिनयासोबतच दिग्दर्शनात देखील यश मिळवले. अशीच अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. मालिकांपासून सुरु झालेला मृण्मयीचा प्रवास चित्रपटांपर्यंत व्हाया दिग्दर्शन असा पोहचला आहे. आज मृण्मयी मराठी इंडस्ट्रीमधील टॉपची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दिसायला सर्वसामान्य मुलींप्रमाणेच मात्र कमालीची प्रतिभा असणाऱ्या मृण्मयीने स्वबळावर तिचे वेगळे असे अस्तित्व या क्षेत्रात निर्माण केले. नुकताच मृण्मयीने तिचा वाढदिवस साजरा केला. या दिवसाचे औचित्य साधत जाणून घेऊया तिच्या लग्नाआधी असलेल्या विचारांबद्दल.

डिसेंबर २०१६ साली मृण्मयीने व्यावसायिक असलेल्या स्वप्नील रावसोबत लगीनगाठ बांधली. मृन्मयीचे लग्नाचे फोटो, व्हिडिओ तेव्हा तुफान व्हायरल झाले होते. एक अभिनेत्री असलेल्या मृण्मयीने या क्षेत्राबाहेरील व्यक्तीची जोडीदार म्हणून निवड केल्यानंतर अनेकांना आश्चर्य देखील वाटले. मात्र तिने तिचा हा निर्णय योग्य ठरवला. आज आम्ही तुम्हाला या दोघांच्या भेटीबद्दल आणि मृण्मयीच्या मनात लग्नाबद्दल असलेल्या न्यूनगंडाबद्दल सांगणार आहोत.

मृण्मयीने तिचे लग्नाबद्दलचे विचार अभिनेत्री आणि नृत्यांगना असलेल्या सुखदा खांडकेकर हिच्या ‘अनसेंसर्ड’ या कार्यक्रमात बोलून दाखवले होते. ती म्हणाली होती की, “खरं तर स्वप्नील आयुष्यात येण्याआधी मी प्रेम या भावनेबद्दल साशंक होती. प्रेम खरंच असते का? हा प्रश्न नेहमी मला पडायचा. मी तर याबद्दलच्या सर्व आशा सोडून दिल्या होत्या. मात्र स्वप्नील मला माझ्या आयुष्याच्या अशा वळणावर भेटला जेव्हा मी लग्न प्रेम याचं पलीकडे गेले होते. मला लग्न करायचे आहे आणि मला शोभेल असाच नवरा मिळवा एवढीच एक इच्छा मी ठेवली होती.”

लग्नाआधी अनेकांनी मला खूपदा ऐकवले की, ” लग्न झाल्यावर रडायचेच आहे, बसमध्ये रडण्याऐवजी मर्सिडीजमध्ये रड… असा विचार करून लग्न करायचं असतं का? असा विचार माझ्या डोक्यात होता. मला अजिबात आशा नव्हती की, मी इतक्या सहजपणे कोणाच्या प्रेमात पडेल आणि असं काहीतरी होईल, असे मला तेव्हा वाटले नव्हते. स्वप्नील आला आणि सर्व बदलले. मला जसा अपेक्षित होता, स्वप्नील तसाच मला भेटला. जे काही डोक्यात सुरू होते, ते स्वप्नील भेटल्यानंतर सर्व थांबले. जोडीदार म्हणजे काय असतो, याचे उत्तर स्वप्नीलच्या रूपात मला मिळाले. त्याच्या सारख्या कणखर आणि ख-या व्यक्तीला भेटून माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. माझा नव्याने प्रेमावर विश्वास बसला आणि पुन्हा नव्याने मी मला सापडले…”

मृण्मयी आणि स्वप्निल यांनी मात्र अरेंज्ड मॅरेज केले. मृण्मयीने अग्निहोत्र, कुंकू आदी मालिका तर एक कप च्या, मोकळा श्वास, संशय कल्लोळ, धाम धूम, आंधळी कोशिंबीर, पुणे व्हाया बिहार, साटं लोटं पण सगळं खोटं, मामाच्या गावाला जाऊया, कट्यार काळजात घुसली, नटसम्राट आदी हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सिनेसृष्टी पुन्हा शोक सागरात, भरदिवसा ‘या’ प्रसिद्ध मॉडेलने घेतला गळफास

कल्पनेपलीकडील वास्तवाची गोष्ट सांगणाऱ्या ‘वाय’ चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

विराट कोहली जेव्हा अनुष्का शर्मासाठी सार्वजनिक ठिकाणी पोहोचला होता बेकरीत, तेव्हा घडलं असं काही 

हे देखील वाचा