Wednesday, August 6, 2025
Home मराठी ‘बदलतीये प्रेमाची परिभाषा…’, मृण्मयी, शशांक अन् अभिजित घेऊन येतायेत नवी कोरी वेबसीरिज; शेअर केली पहिली झलक

‘बदलतीये प्रेमाची परिभाषा…’, मृण्मयी, शशांक अन् अभिजित घेऊन येतायेत नवी कोरी वेबसीरिज; शेअर केली पहिली झलक

आजकाल चित्रपटाप्रमाणे वेबसीरिजला देखील जोरदार प्रतिसाद मिळत असतो. हिंदी तसेच मराठी वेबसीरिजला प्रेक्षक खास पसंती दर्शवत असतात. अशातच मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे एक नवीकोरी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती मृण्मयी देशपांडे हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.

मृण्मयी देशपांडेने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या आगामी वेबसीरिजचा टिझर प्रदर्शित केला आहे. यामध्ये तिच्यासोबत अभिनेता शशांक केतकर आणि अभिजित खांडकेकर दिसत आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री देखील सुपर दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “बदलतीये प्रेमाची परिभाषा. प्लॅनेट मराठी ओटीटीची आगामी वेबसीरिज ‘सोप्प नसतं काही’ पाहा एक झलक.” (Mrunmayee deshpande’s new webseries coming soon)

त्यांची ‘सोप्प नसतं काही’‌ ही वेबसीरिज काहीतरी नवीन कहाणी घेऊन येणार असल्याची झलक दिसत आहे. शशांक, मृण्मयी आणि अभिजितचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी सर्वजण आशा व्यक्त करत आहेत. त्यांचे चाहते देखील या पोस्टवर जोरदार कमेंट करून त्यांचे अभिनंदन करत आहेत.

‘सोपं नसतं काही’ या वेबसीरिजचे विप्लवा एंटरटेनमेंटस एलएलपीचे संतोष रत्नाकर गुजराथी हे निर्माते आहेत. वेब सीरिजचे लेखक, दिग्दर्शक, संगीतकार मयुरेश जोशी हे आहेत. विप्लवा एंटरटेनमेंटस् एलएलपीने याआधी रंगभूमीवर ‘ॲब्सोल्युट’, ‘घरात मॅरीड बाहेर बॅचलर’, ‘नॅाक नॅाक सेलिब्रिटी’ अशी वैविध्यपूर्ण नाटके, तर छोट्या पडद्यावर ‘रुद्रम’, ‘कट्टीबट्टी’ अशा मालिकांची निर्मिती केली आहे. ‘किस्से बहाद्दर’ या वेबसीरिजची निर्मिती देखील त्यांनी केली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मेहंदी लगा के रखना’ गाण्याचं इंग्लिश व्हर्जन ऐकून प्रियांका चोप्रा झाली लोटपोट! तुम्ही ऐकलं का?

-‘तेरे चेहरे से नजर नहीं हटती, नजारे हम क्या देखे!’, शालूच्या फोटोने पुन्हा उडवली चाहत्यांची झोप

-पारदर्शी साडीतील ‘तो’ सीन अन् दाऊदसोबतचे नाते, जाणून घ्या मंदाकिनीबद्दल ‘या’ गोष्टी

हे देखील वाचा