Friday, July 5, 2024

धोनीची फटकेबाजी पाहायला मिळणार वेब सिरीजमध्ये, लवकरच घेऊन येत आहे…

भारतीय संघाचा कॅप्टन कूल एमएस धोनीने काही दिवसांपुर्वीच क्रिकेटला अलविदा केला. सध्या तो संयुक्त अरब अमिरातीमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. आता याच धोनीला सिनेसृष्टीत पदार्पणाचे वेध लागेल आहेत. एक अभिनेता म्हणून नव्हे तर तो वेगळीच भूमिका निभावणार आहे. धोनी निवृ्तीतनंतर काय करणार? याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले असताना धोनीची पत्नी साक्षी त्याच्या निवृत्तीनंतरच्या योजनांचा खुलासा केला.

धोनी प्रोड्यूस करणार वेब सीरिज

क्रिकेटला राम राम ठोकलेला धोनी आता नव्या मैदानावर म्हणजेच मनोरंजन जगतात पदार्पण करणार आहे. खरंतर धोनीने २०१९मध्ये त्याने ‘धोनी एंटरटेनमेंट’ या नावाने प्रॉडक्शन हाऊस लाँच केले होते. याच्या बॅनरखाली अनेक भाषांमध्ये एक डॉक्युमेंटरी बनवली होती, ज्याने नाव होते ‘रोअर ऑफ द लायन’ आणि कबीर खानने दिग्दर्शित केली होती. त्यानंतर आता धोनीचे हे प्रॉडक्शन हाऊस एक विज्ञानावर आधारित पौराणिक वेब सीरिज बनवणार आहे, ज्यामध्ये धोनीची भागीदारीही असणार आहे. धोनी एंटरटेनमेंटची व्यवस्थापकीय संचालक साक्षी धोनी आहे.

धोनी एंटरटेनमेंट आता एक अशी सीरिज तयार करणार आहे, जी एका लेखकाच्या एक अप्रकाशित पुस्तकाचे रुपांतरण आहे. याबाबत धोनीची पत्नी साक्षी धोनीने म्हटले की, सीरिज एक रोमांचक आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना साक्षीने म्हटले की, साक्षी एका अप्रकाशित पुस्तकावर एक वेब सीरिज बनवणार आहे, जी एका युवा लेखकाने लिहिली आहे. या पुस्तकात लिहिण्यात आलेली गोष्ट एका रहस्यमयी अघोरीवर आहे. जो अनेक हायटेक सुविधांसह निर्जन बेटावर राहतो.

साक्षीने पुढे बोलताना सांगितले की, “सध्या यावर काम सुरू आहे आणि ते कास्ट (पात्र) निश्चित करणार आहेत. यासाठी ते लवकरच एक दिग्दर्शकही निश्चित करतील. क्रिएटिव्ह टीम सध्या यावर काम करत आहे.”

“धोनी प्रॉडक्शनच्या ऑपरेशन्सचा भाग असेल आणि वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेईल. त्यामुळे तोच नवीन चेहऱ्यांना काम करण्याची संधी देईल,” असेही साक्षी पुढे बोलताना म्हणाली.

हे देखील वाचा