Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आईचे दुःखद निधन

बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या आईचे दुःखद निधन

प्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक असणाऱ्या मुकेश छाब्राच्या आईचे आज मुंबईमध्ये दुःखद निधन झाले आहे. कमला छाब्रा यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. कमला छाब्रा यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये दुःखाचे वातावरण आहे. या बातमीनंतर अनेक कलाकारांनी रुग्णालयात जाऊन मुकेशची भेट घेतली. यात दीपिका पादुकोण, नूपुर सेनन, फराह खान आदी अनेक सेलेब्रिटींचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार मुकेश छाब्राच्या आईवर १४ एप्रिल रोजी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. या संकटकाळी बॉलिवूडमध्ये मोठमोठ्या कलाकारांनी त्याला आधार देत सांत्वना दिली. मागच्या तीन दिवसांपासून कमला छाब्रा या बेशुद्ध होत्या. त्यांना डॉक्टर शुद्धीवर आणण्याचे पूर्ण प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश आले नाही आणि वयाच्या ७३ व्या वर्षी कमला यांचे निधन झाले.

मुकेश छाब्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली असून, सोबतच १४ एप्रिलला सकाळी ओशिवरा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगितले. या दुःखद समयी त्यांच्या पाठीशी संपूर्ण बॉलिवूड उभे आहे.

दरम्यान मुकेश हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक असून, त्यांनी सुमारे ३०० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी कास्टिंग केले आहे. सुशांत सिंह राजपूत, राजकुमार राव, मृणाल ठाकुर, सान्या मल्होत्रा, प्रतीक गांधी आणि फातिमा शेक आदी कलाकारांना बॉलिवूडमध्ये आणण्यामागे मुकेशच्या होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

हृदयविकारामुळे मनोरंजन विश्वाने गमावले मोठे स्टार; यादी पाहून तुम्हीही व्हाल भावूक

‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीचे दुःखद निधन, घरात आढळली मृतावस्थेत

हे देखील वाचा