मुकेश खन्ना (Mukesh Khanna) असं नाव घेतलं की लगेच “शक्तिमान” (Shaktimaan)आठवताे. ह्याच मालिकेमुळे त्यांना खास ओळख मिळाली. आज २३ जून, त्यांचा वाढदिवस आहे. या निमित्तानं त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल काही खास गाेष्टी जाणून घेऊया.
मुकेश खन्ना यांनी अभिनयात करिअर करायचं ठरवण्यापूर्वी त्यांनी B.Sc आणि लाॅमध्ये पदवी घेतली हाेती. त्यानंतर पुण्यातल्या फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट(FTI) मधून अभिनयाच शिक्षण घेतलं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात चित्रपटांत छाेट्या भूमिकांमधून केली. 1981 साली ‘रुही’ या चित्रपटातून त्यांनी बाॅलिवूडमध्ये पाऊलं ठेवलं, ज्यांत त्यांनी एक छाेटी भूलिका केली हाेती. काही वर्षं काम केल्यानंतर त्यांनी टीव्हीकडे वळणं घेतलं. आणि खरतरं, चित्रपटांपेक्षा टीव्हीमुळेच लाेकांना मुकेश खन्ना नावाची ओळख झाली.
1988 साल मध्ये बी.आर. चाेप्रा यांनी ‘महाभारत’ ही मालिका टीव्हीवर आणली आणि ती खूप गाजली. या मालिकेत मुकेश खन्ना यांनी भीष्म पितामहांची भूमिका केली हाेती. मुकेश खन्ना यांनी ही भूमिका इतकी जबरदस्त केली की, आजही प्रेक्षकांनी भीष्म पितामह म्हणून त्यांच्याशिवाय दुसरं काेणी आवडत नाही. भीष्म पितामह म्हटलं की, लाेकांच्या डाेळ्यासमाेर आजही मुकेश खन्ना यांच्या चेहरा येताे !
1997 साल मध्ये मुकेश खन्ना यांनी ‘शक्तिमान’ ही मालिका बनवली आणि त्यात स्वतः ‘शक्तिमान या सुपरहाेराे च्या भूमिकेत दिसेल. हा राेल एवढा गाजला की, ताे टीव्हीवरचा एक कायम लक्षात राहणारा सुपरहिराे बनला. 90 च्या दशकात लहान मुलांमध्ये ही मालिका खूप फेम्स हाेती. आजही शक्तिमान एक चित्रपट येणार अशी चर्चा सुरू आहे.
‘शक्तिमान’ नंतर मुकेश खन्ना यांनी आणखी काही पौराणिक आणि सुपरहिराे मालिका केल्या, ज्यात ‘चंद्रकांता’ आणि ‘आर्यमान’ खूप गाजल्या. ते ‘प्यार का दर्द है मीठा मीठा प्यारा प्यारा’ (2012) आणि वारिस (2016) या मालिकांमध्येही झळकले हाेते. मुकेश खन्ना जेव्हा चित्रपटांत काम करत हाेते, तेव्हा अनेक लाेक त्यांची तुलना अमिताभ बच्चन यांच्याशी करायचे. काही जणांना वाटायचं की, ते अमिताभ यांची नक्कल करतात. असंही म्हणतात की, एकदा खुद्द अमिताभ बच्चन यांनीही असं सांगितलं हाेतं की, “मुकेश माझी काॅपी करताे”.
या गाेष्टीवर वर बाेलताना एका मुलाखतीत मुकेश खन्ना म्हणाले हाेते, “माझा एक मित्र अमितजींसाेबत चित्रपट पाहायला गेला हाेता. इंटरव्हलमध्ये माझा एक अॅड आली, तेव्हा अमितजी म्हणाले, ‘हा मुलगा माझी काॅपी करताे’.” पण मुकेश खन्ना यांचं स्पष्ट म्हणणं आहे, “मी काेणाचीही नक्कल करत नाही”. मुकेश खन्ना आता 67 वर्षांचे झाले आहेत, पण तरीही ते अजूनही खूप अॅक्टिव्ह आहेत. आजच्या काळानुसार त्यांनी स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. ते स्वतःचा एक यूट्यूब चैनल चालवतात, ज्यावर सेलिब्रिटींशी गप्पा मारतात. तसचं या चॅनलवर ते वेगवेगळ्या विषयांवर आपलं मतही मांडतात.