अनेक कलाकार सध्या टेलिव्हिजनवर पदार्पण करताना करताना दिसत आहेत. प्रेक्षकांचे आवडते कलाकार दररोज त्यांना भेटायला त्यांच्या घरी येतात त्यामुळे त्यांच्यामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. अशातच सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि उमेश कामत दिसत आहेत.
प्रेम करणारी दोन माणसे एकमेकांपासून दुरावून अनेक वर्षांनी एकत्र भेटतात. ही सुंदर कहाणी या मालिकेत दाखवली आहे. उमेश आणि मुक्ता यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांची फॅन फॉलोविंग देखील जास्त आहे. अशातच मालिकेतील कलाकारांचा एक भन्नाट व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये मीरा आणि मनू म्हणजेच अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि पूर्वा फडके आहेत. या दोघींसोबत आणखी एक खास व्यक्ती दिसत आहे. ती म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट. (Mukta barve share dance video on social media)
हा व्हिडिओ मुक्ता बर्वेने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, त्या तिघी ‘हवा मे उडती जाये’ या गाण्यावर डान्स करताना दिसत असून, त्या तिघी एका गार्डनमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्या सुरुवातीला सेम डान्स स्टेप्स करतात, परंतु नंतर त्या तिघीही डान्स स्टेप्स विसरतात. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेत नुकतेच मीरा आणि आदीराजचे लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नात प्रिया बापटची खास झलक दाखवली होती. तिने सांगितले होते की, ती आदीराजची पहिली पत्नी आहे. त्यामुळे मालिकेत ट्विस्ट आला होता, परंतु हा त्यांनी केलेला प्रँक केला होता. त्या दोघांचे लग्न अगदी निर्विघ्न पार पडले. परंतु लग्न झाल्यानंतर आदीराज आणि मीराच्या अफेअरबाबत त्यांच्या घरच्यांना समजले आहे. त्यामुळे मालिका सध्या नव्या वळणावर आली आहे.
हेही नक्की वाचा –