टेलिव्हिजनवर मालिकांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांसाठी मालिका त्यांचे दुसरे जग बनते. या मालिका वर्षानुवर्षे चालतात. या मालिकांचा सेट कलाकारांसाठी दुसरे घर बनते. सर्व कलाकार अनेक महिने, वर्ष सोबत असल्यामुळे त्यांच्यात एक प्रकारचे खास नाते तयार होते. मात्र जेव्हा या मालिका संपतात तेव्हा मात्र सर्वच कलाकार दुखी होतात. एवढ्या दिवसांची सोबत, सवय सर्वच संपणार असते. वाईट तर नक्कीच वाटते. आजच्या सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक व्यक्ती या माध्यमावर व्यक्त होत त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देते. कलाकार देखील या माध्यमाचा वापर करत आपल्या भावना सांगतात.
नुकतीच स्टार प्रवाहावरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका संपली. या मालिकेला प्रेक्षकांचे तुफान प्रेम मिळाले. ही मालिका वेगवगेळ्या कारणांमुळे अमाप गाजली. या मालिकेतील माऊ आणि शौनक ही मुख्य जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी होती. आता ही मालिका संपल्यानंतर मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या योगेश सोहानीने अर्थात शौनकने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
योगेशने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “आज “मुलगी झाली हो” या मालिकेचा शेवटच्या भागा प्रदर्शित झाला, ७०० हुन अधिक भागांचा हा अविस्मरणीय प्रवास थांबला. थांबला म्हणणं खरं तर चुकीचं ठरेल, कारण जे कुठेतरी थांबलय ते कुठेतरी नव्याने सुरू होणार आहे. आज हे लिहिताना शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी, घटना, किस्से, प्रसंग, डोळयांसमोर आले. हा प्रवास सोपा नव्हता अनेक अडचणी आल्या, अप्रिय घटना घडल्या, न पटणारी व न आवडणारी माणसे भेटली, त्यांचे स्वभाव कळले त्याचबरोबर असंख्य चांगली, प्रेमळ माणसे (कलाकार) भेटले, आणि ते आयुष्याचा एक भाग होऊन गेले. शौनक ही व्यक्तिरेखा साकारताना मला या घडलेल्या सगळ्या प्रसंगाचा, भेटलेल्या माणसांचा, त्यांच्या आलेल्या अनुभवाचा खूप फायदा झाला.
इन्स्टाग्राम इतकं ऍडव्हान्स असलं तरी शब्द मर्यादा आणि फोटो अपलोड करायला देखील मर्यादा आहेत हे दुर्दैव आहे, हे मला ३-४ तास मेहेनत करून जो Write Up लिहिला आणि तो अपलोड करायला गेलो तेव्हा कळलं……असो मार्क झुकरबर्ग जेव्हा हा प्रोब्लेम सोडवेल तेव्हा सोडवेल, पण या मार्यादेमुळेच मला सगळ्याची नावं इच्छा असूनही लिहिता येत नाहीयेत याच वाईट वाटतय.
पण मीही खूप चिवट आहे, सगळी नाव जोपर्यंत लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि त्यांचे आभार मानत नाही तो पर्यंत मला चैन पडणार नाही. तर माझ्या फेसबुक वरील पोस्ट मध्ये त्या सगळ्यांबद्दल लिहून आभार मानले आहेत ते जरूर वाचा, फेसबुक ची लिंक Bio मध्ये देत आहे. ते वाचून मायबाप रसिक प्रेक्षकांना कळेल की किती माणसे एखाद्या प्रोजेक्टशी निगडित असतात आणि त्याच योगदान किती महत्त्वाच असतं. लवकरच एका वेगळ्या मालिकेत, वेगळ्या भूमिकेत भेटू तोपर्यंत पुनरागमनायच……योगेश माधव सोहोनी.”
सध्या योगेशची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. योगेशने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेआधी ‘वचन दिले तू मला, आणि ‘अस्मिता’ या मालिकेत काम केले आहे. त्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेने अमाप ओळख मिळवून दिली.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट
चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’